एक्स्प्लोर
मी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही: केजरीवाल

नवी दिल्ली: पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास अरविंद केजरीवाल मुख्य़मंत्री होतील, या मनिष सिसोदिया यांच्या वक्तव्याला अरविंद केजरीवाल यांनी मात्र नकार दिला आहे. 'दिल्लीच्या लोकांनी मोठ्या विश्वासाने माझ्याकडे दिल्लीची सत्ता दिली असून मला पंजाबच्या मुख्यमंत्रिपदात रस नाही.' असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तेथील स्थानिक आमदारालाच मुख्यमंत्रीपदी संधी दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मनिष सिसोदिया यांनी असं वक्तव्य करण्यात काहीही चूक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत असं वक्तव्य मोहालीतील एका सभेत मनीष सिसोदिया यांनी केलं होतं 'पंजाबचे पुढचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होतील' असं सिसोदिया म्हणाले होते. 4 फेब्रुवारीला पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी सुरु झाली आहे.
आणखी वाचा























