#VizagGasLeak | विशाखापट्टणम गॅस गळती प्रकरणावर अनुपम खेर ते चिरंजीवी पर्यंत अनेकांकडून दुःख व्यक्त
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये घडलेल्या #VizagGasLeak प्रकरणावर आता अनेक सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केलं आहे.दक्षिण सुपरस्टार चिरंजीवी, अल्लू अर्जुन आणि महेश बाबू यांच्यासह दक्षिणेतील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी या दुःखद दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे एका फार्मा कंपनीतून झालेल्या वायू गळतीमुळे एका बालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. विशाखापट्टणममध्ये घडलेल्या ##VizagGasLeak प्रकरणावर आता अनेक सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केले आहे. दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी, अल्लू अर्जुन आणि महेश बाबू यांच्यासह दक्षिणेतील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी या दुःखद दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. या घटनेची बातमी समजल्यानंतर चिरंजीवी यांनी ट्विटरवर लिहिले की, “लॉकडाऊननंतर कारखाने उघडण्यास परवानगी देण्यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी.
दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी ट्विट केले की, "विझाग गॅस गळती घटनेची जी छायाचित्रं समोर आली, ती अत्यंत दुःखद आहेत. जे सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांच्यासाठी मी मी प्रार्थना करतो. या अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो'
बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरने यांनीही घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं.
Deeply saddened by the death of #VizagGasLeak victims. My heart goes out to their families. My heartfelt condolences. I am praying for the people affected by this tragedy. 🙏
— Anupam Kher (@AnupamPKher) May 7, 2020
सुपरस्टार महेश बाबू यांनीही याबाबत ट्विट करून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले की, “विझाग गॅस गळतीची घटना हृदय हेलवणारी आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत, अशी घटना घडल्याने परिस्थिती आणखी वाईट झाली आहे.
अभिनेता रवी तेजानेही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. या घटनेने तो अंतर्गतरित्या अस्वस्थ आहे. यातील पीडित कुटुंबांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. यात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धाजली वाहत असल्याचे ट्विट अभिनेता रवी तेजाने केलं आहे.Heartwrenching to hear the news of #VizagGasLeak, more so during these challenging times... Heartfelt condolences and strength to the bereaved families in this hour of need. Wishing a speedy recovery to those affected. My prayers for you... Stay safe VIZAG.
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) May 7, 2020
अभिनेत्री तमन्नाह भाटियानेही याबद्दल दुःख व्यक्त केले. विझाग गॅस गळतीची घटना अत्यंत वेदनादायी आहे. यात जीव गेलेल्या लोकांना मी श्रद्धाजली वाहते. तर, जे जखमी आहेत, अशांसाठी प्राथर्ना करत असल्याचे तमन्नाने लिहलं आहे.
Woke up to the horrific news of the #VizagGasLeak.
My condolences to everyone who lost their families and wishing a speedy recovery to those hospitalised 🙏 — Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) May 7, 2020
काय आहे घटना? आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे एका फार्मा कंपनीतून वायू गळती झाली. आज (7 मे) सकाळी ही घटना घडली. विशाखापट्टणमच्या आर आर वेंकटपुरम गावात एलजी पॉलिमर कंपनीतून वायू गळती झाली. यामुळे एका बालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. वायू गळतीमुळे गावासह संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने आजूबाजूची पाच गावं रिकामी केली आहेत. एलजी पॉलिमर कंपनीच्या तीन किमी परिसरात वायू गळतीचा परिणाम दिसत आहे.
Visakhapatnam gas leak | विशाखापट्टणममध्ये वायू गळती, बालकासह आठ जणांचा मृत्यू