Andhra Pradesh : आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी घेतली पंतप्रधानांची भेट, पोलावरम कृषी प्रकल्पासह विविध मुद्यांवर चर्चा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. जगनमोहन यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली.
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना पोलावरम कृषी प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला लवकर मंजुरी देण्याची मागणी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा-2014 मधील अनेक प्रलंबित तरतुदींच्या संदर्भात देखील पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. या कायद्याची अंमलबजावणी होणे बाकी आहे.
पोलावरम कृषी प्रकल्पाच्या 55,000 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासह इतर प्रलंबित प्रकल्पांच्या लवकर मंजुरीसाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी मागणी जगनमोहन रेड्डी यांनी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे विविध प्रश्न जगनमोहन यांनी यावेळी उपस्थित केले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यातील विभाजनानंतरच्या वीज देय रकमेबाबतचा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. दरम्यान, रेड्डी यांची या वर्षातील मोदींसोबतची ही दुसरी भेट होती. रेड्डी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील राज्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
पंतप्रधानांसोबत केलेल्या चर्चेत मुख्यमंत्री जगनमोहन यांनी आंध्र प्रदेश खनिज विकास महामंडळाला 16 ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर वाळूचे खनिज वाटप करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. तसेच राज्यात आणखी 12 वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता द्यावी, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. यावेली जगनमोहन म्हणाले की, राज्य सरकारने फाळणीच्या काळात वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून प्रलंबित बिलांच्या स्वरुपात 3 हजार 625.25 कोटी रुपये खर्च केले आहेत. महसुली तूट भरुन काढण्यासाठी पंतप्रधानांना विनंती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: