एक्स्प्लोर
Advertisement
कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल, मृत्यूआधी मेजर शर्मा यांचा व्हॉट्सअॅपवर मेसेज
सोमवारी (17 जून) पहाटे अचबालच्या बदौरा गावात भारतीय सैन्याची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यावेळी 19 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात असलेले केतन शर्मा शहीद झाले.
मेरठ : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग चकमकीत शहीद झालेले मेजर केतन शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवर फोटोसह एक मेसेज पाठवला होता. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं होतं की, कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल. चकमकीआधी सोमवारी सकाळी सात वाजता त्यांनी हा मेसेज आणि फोटो आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवला होता. हा फोटो शेअर केल्याच्या काही तासातच अनंतनागमधील चकमकीत केतन शर्मा शहीद झाल्याचं वृत्त आलं होतं.
पत्नीच्या मेसेजला रिप्लाय नाही
मेजर केतन शर्मा यांचे चुलत बंधू अनिल शर्मा म्हणाले की, "जेव्हा त्यांनी व्हॉट्सअॅप मेसेज केला होता, तेव्हा त्यांच्या पत्नीने रिप्लाय केला होता. पण आम्हाला आशा होती की ते सुरक्षित परत येतील. मात्र बराच वेळ त्यांचा रिप्लाय आला नाही. त्यांची पत्नी इरा मुलीसह माहेरी असताना, केतन शर्मा जखमी झाल्याची माहिती मिळाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास सैन्याचे अधिकारी घरी आले आणि केतन शर्मा शहीद झाल्याचं त्यांनी सांगितलं."
डोक्यात गोळी लागून केतन शर्मा शहीद
सोमवारी (17 जून) पहाटे अचबालच्या बदौरा गावात भारतीय सैन्याची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यावेळी 19 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात असलेले केतन शर्मा शहीद झाले. मेजर केतन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली झाडा-झुडपात लपलेल्या अतिरेक्यांचा शोध सुरु होता. त्याचवेळी अतिरेक्यांनी गोळीबार केला. ही गोळी केतन शर्मा यांच्या डोक्यात लागली आणि ते शहीद झाले.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
मूळचे मेरठचे असलेल्या 32 वर्षीय मेजर केतन शर्मा यांच्या कुटुंबात पत्नी इरा मंदर शर्मा, चार वर्षांची मुलगी कायरा, आई-वडील आणि एक धाकटी बहिण आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
निवडणूक
Advertisement