एक्स्प्लोर

विधानसभा निवडणूक लढवणार नाही : आनंदीबेन पटेल

आनंदीबेन पटेल या गुजरातमधील घटलोडिया विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. 1998 सालापासून त्या आमदार म्हणून राजकारणात कार्यरत आहेत.

गांधीनगर : गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आनंदीबेन पटेल यांनी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून कळवलं आहे. आनंदीबेन यांनी आपल्या वयाचं कारण देत, निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून केंद्रात गेल्यानंतर आनंदीबेन पटेल यांच्या खांद्यावर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र गेल्यावर्षी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी विजय रुपाणी यांची निवड झाली. आनंदीबेन पटेल या गुजरातमधील घटलोडिया विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. 1998 सालापासून त्या आमदार म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अशी मागणी केली होती की, आनंदीबेन पटेल यांनाच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केलं पाहिजे. स्वामी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची लोकप्रियता गुजरातमध्ये वेगाने वाढत आहे. मला वाटतं, भाजपला सहज विजय मिळवण्यासाठी आनंदीबेन पटेल यांनाच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनवलं पाहिजे.” आनंदीबेन पटेल या 1987 सालापासून भाजपशी जोडल्या आहेत. गुजरात सरकारमध्ये त्यांनी महसूल, अर्थ यांसह अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील राज्यांना हादरा, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील राज्यांना हादरा, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार
अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार
NCERT कडून नववीच्या सामाजिक शास्त्र विषयातून संविधानाची प्रस्तावनाच वगळली; 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्दांनाही केराची टोपली, वादग्रस्त ठरलेल्या SIR आणि आणीबाणीचा समावेश
NCERT कडून नववीच्या सामाजिक शास्त्र विषयातून संविधानाची प्रस्तावनाच वगळली; 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्दांनाही केराची टोपली, वादग्रस्त ठरलेल्या SIR आणि आणीबाणीचा समावेश

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Embed widget