एक्स्प्लोर

खासदार नवनीत राणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो.

अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती, अपक्ष आमदार रवी राणा यांनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अमरावती जिल्हा आणि विदर्भाच्या विकासावर तिघांमध्ये 47 मिनिटं चर्चा रंगली. अमरावती जिल्ह्याच्या विभाजनासोबत मतदारसंघातल्या 12 मागण्या नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदींसमोर मांडल्या. यावेळी, 'माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील', असं उत्तर मोदींनी दिलं. गेल्या आठवड्यात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने दोघं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘बदल होत असतात’ अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांनी जोरही धरला. आता थेट पंतप्रधान मोदींसोबत भेट झाल्याने पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवनीत राणा यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात शिवसेनेकडून तीन वेळा खासदार राहिलेल्या आनंदराव अडसूळ यांना पराभूत करत संसद गाठली. या निवडणुकीत नवनीत यांना काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो. मात्र सध्या तरी आपण कुठल्या पक्षात जात नसून, अपक्षच राहणार असल्याची भूमिका या दाम्पत्याने मांडली. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र आनंदराव अडसूळ यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर नवनीत राणा यांनी न थांबता गेली पाच वर्ष अमरावती जिल्हा पिंजून काढला आणि आपलं काम सुरु ठेवलं होतं. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीने युवा स्वाभिमान पक्षाला महाआघाडीत सामावून घेतलं. नवनीत कौर राणा यांनी दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख निर्माण केली होती. अमरावतीत आमदार रवी राणा यांनी  2011 साली रेकॉर्ड ब्रेक सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी स्वत: रवी राणा आणि नवनीत कौर हे विवाहबद्ध झाले होते. यावेळी तब्बल 3100 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Politics: नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
BJP : महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
Petrol Diesel Price hike: ज्याची भीती होती तेच घडणार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?
ज्याची भीती होती तेच घडणार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cameron Green: तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
Share Market : शेअर बाजारात पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांची एका दिवसात 900000 कोटींची कमाई, सेन्सेक्स- निफ्टीत तुफान तेजी
शेअर बाजारात पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांची एका दिवसात 900000 कोटींची कमाई, सेन्सेक्स- निफ्टीत तुफान तेजी
Bihar Politics: नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? राजकीय चर्चेमागचं नेमकं कारण काय?
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? राजकीय चर्चेमागचं नेमकं कारण काय?
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
Ashok Kharat : परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
KKR : आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या संघाची विजयाची पाटी कोरी, कोलकाता नाईट रायडर्सचं नेमकं काय चुकलं? मोहम्मद कैफ यांनं नेमकं कारण सांगितलं
शाहरुख खानच्या संघाची विजयाची पाटी कोरी, अजिंक्य रहाणेच्या केकेआरचं काय चुकलं, मोहम्मद कैफ म्हणाला...
Embed widget