एक्स्प्लोर

मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निवडणुकांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

मुंबई: राज्यातील राजकीय पक्षाना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Election) वेध लागले असून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. एकीकडे प्रशासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर होत असून दुसरीकडे राजकीय पक्षांच्या बैठका आणि रणनीती सुरू आहे. तसेच, महाविकास आघाडी आणि महायुती होणार की नाही, यावरही मंथन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येतील यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना शरद पवारांकडून देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक पार पडणार असल्याची देखील माहिती बैठकीत देण्यात आली. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत निर्णय करा, अशा सूचनाही शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे. काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे, आज अल्पसंख्याक समाजाचा निर्णय घेतला असेच युवक आणि युवतींचा निर्णय होणार आहे, असे पवारांनी सांगितले.

दरम्यान, आजच्या बैठकीत शरद पवारांना धर्मनिरपेक्षता जपण्याचं आवाहनही सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलं आहे. सातत्याने वादग्रस्त बोलणाऱ्या संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा निषेधही शरद पवारांनी नोंदवला. पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जाती-जातीत तणाव निर्माण होईल, अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. जातीय सलोखा ठेवा, स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका, बोलताना प्रेमाची भाषा वापरा, आपण करत असलेल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना देखील शरद पवारांनी बैठकीत दिल्या आहेत. तसेच, राजकारणात जाती धर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. लोकांच्या लोकप्रियतेपेक्षा ते जास्त महत्वाचे आहे. वाचाळवीर वाढले आहेत, दुदैव आहे कोणी कोणाकडून काय खरेदी करावे यावर सरकार गप्प बसते? सरकारचा त्याला पाठिंबा आहे का? दरी निर्माण केली जातोय, असेही पवारांनी म्हटले.

अतिवष्टीग्रस्तांना सरकारची मदत तुटपूंजी

अतिवृष्टीच्या संदर्भात राज्य सरकार जी मदत करत आहे, ती तटपुंजी आहे. केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली पाहिजे होती, आमच्या वेळेस केंद्रीय पथक येऊन पाहणी करुन भरघोस मदत देत होते. नरसिंह राव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते राज्यात अतिवृष्टीच्या पाहण्यासाठी येणार होते. पण, तेव्हा मीच त्यांना पाहण्यासाठी येऊ नका असे म्हटले. कारण, शासकीय यंत्रणा तुमच्या दौऱ्यासाठी लागेल, त्यामुळे मदतही होणार नाही, अशी माहिती शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना भाषणादरम्यान दिली.

हेही वाचा

राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांची हिंदुत्ववादी वाटचाल, अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटलांना शह देणार का?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
अमोलदादा मला दत्तक घ्या, मी मिटकरी आडनाव लावायला तयार; लग्नाळू तरुणाचे आमदार मिटकरींनाही पत्र
अमोलदादा, मला दत्तक घ्या, मी मिटकरी आडनाव लावायला तयार; लग्नाळू तरुणाचे आमदार मिटकरींनाही पत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर
Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
Ambadas Danve on Ajit Pawar : अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा
Shivaji Sawant BJP : शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश का रखडला? कारण काय? ABP Majha
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
अमोलदादा मला दत्तक घ्या, मी मिटकरी आडनाव लावायला तयार; लग्नाळू तरुणाचे आमदार मिटकरींनाही पत्र
अमोलदादा, मला दत्तक घ्या, मी मिटकरी आडनाव लावायला तयार; लग्नाळू तरुणाचे आमदार मिटकरींनाही पत्र
Sangli Crime: सांगलीत दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंना वाढदिनीच संपवलं; आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या
सांगलीत दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंना वाढदिनीच संपवलं; आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या
Share Market Update : भारतीय शेअर बाजारात 'या' पाच कारणांमुळं तेजी, सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, निफ्टी 26 हजारांच्या पार, मार्केट बंद होताना चित्र बदललं
भारतीय शेअर बाजारात 'या' पाच कारणांमुळं तेजी, सेन्सक्स अन् निफ्टीमध्ये तेजीनंतर पुन्हा चित्र बदललं
34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?
34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?
Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
Embed widget