भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद, कुंपण करणार, गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा
India-Myanmar Border : म्यानमार (Myanmar Border) सिमा अधिक सुरक्षीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
India-Myanmar Border : म्यानमार (Myanmar Border) सिमा अधिक सुरक्षीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. म्यानमारच्या सीमेवर आता फेन्सिंग करण्यात येणार आहे. म्हणजेच म्यॅनमार सीमेवर बांगलादेशच्या सीमेप्रमाणे तारेचं कुंपण घालण्यात येणार आहे. त्याशिवाय ये जा ही परवानगीशिवाय होणार नाही, असे अमित शाह यांनी सांगितलं. म्यानमारचे 600 सैनिकांनी आणि लोकांनी मिझोराममध्ये घुसखोरी केली, यावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) बोलत होते.
मागील काही दिवसांपासून भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमावाद उफाळला होता. सीमारेषावर तणावाचं वातावरण होतं. म्यानमारमधून घूसखोरी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले होते. त्यामुळे केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मोठी घोषणा केली. म्यानमार सीमेवरील मोफत ये जा यापुढे बंद करण्यात येणार आहे. त्याशिवाय सीमेवर तारेचं कुंपण घातलं जाणार आहे. बांगलादेश सीमाप्रमाणेच आता म्यॅनमारचीही सीमा अधिक सुरक्षित करण्यात येणार आहे. लवकरच केंद्र सरकार याबाबत अंमलबजावणी करेल, असे अमित शाह यांनी सांगितलं.
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भारत आणि म्यानमार सीमाबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, भारत आणि म्यानमार बॉर्डर ही सीमा याआधी सर्वांसाठी खुली होती, पण यापुढे त्याला फेन्सिंग केले जाणार आहे. घुसखोरी आणि म्यानमारमधून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सरकार दोन्ही देशांमधील मुक्त संचारही बंद करणार आहे.
Addressing the passing out parade of the first batch of Assam Police commandos in Guwahati.
— Amit Shah (@AmitShah) January 20, 2024
গুৱাহাটীত অসম আৰক্ষীৰ কমাণ্ডোসকলৰ প্ৰথম দীক্ষান্ত সমাৰোহ অনুষ্ঠানত বক্তব্য প্ৰদান কৰোঁ। https://t.co/zFgzvoJdah
राम मंदिर आणि 'ती' 500 वर्ष, आतापर्यंत नेमकं काय झाले? वाचा एका क्लिकवर....