Tejas Fighter Jet : एकीकडे ट्रम्प यांचे टॅरिफ, दुसरीकडे भारताची मोठी डील, तेजस विमानासाठी अमेरिका इंजिन पुरवणार
Trump Tariffs : भारत आणि अमेरिकेत होणाऱ्या अब्जावधी डॉलरच्या डिफेन्स डीलनंतर भारतीय वायुसेनेला (Indian Air Force) HAL च्या तेजस फायटर जेटसाठी (Tejas Fighter Jet) GE-404 व GE-414 इंजिन मिळणार आहेत.

मुंबई : भारत आपली वायुसेना (Indian Air Force) अधिक सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय घेणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ (Trump Tariffs) लावल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असला तरी, अमेरिकेची कंपनी जनरल इलेक्ट्रिक (GE Engines) भारतीय तेजस फायटर जेट (Tejas Fighter Jet) साठी इंजिन पुरवणार आहे. ही अब्जावधी रुपयांची डील सप्टेंबरपर्यंत अंतिम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
India US Defence Deal : तेजससाठी 113 नवीन GE-404 इंजिन
संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, या डीलनुसार GE कंपनी LCA तेजस मार्क-1A (LCA Tejas Mark-1A) साठी 113 नवे GE-404 इंजिन भारताला देणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच 97 नवीन तेजस मार्क-1A विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. याआधीच 83 फाइटर जेटसाठी 99 इंजिन खरेदीचे करार झाले आहेत.
वायूसेनेला केव्हा मिळणार तेजस?
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या डीलनुसार 83 विमानांचे इंजिन 2029-30 पर्यंत पुरवणार आहे. त्यानंतर 97 विमानांची दुसरी खेप 2033-34 पर्यंत भारतीय वायूसेनेला मिळेल. GE दरमहा दोन इंजिन भारतात पुरवेल. HAL ने वायुसेनेला पहिले 83 तेजस 2029-30 पर्यंत देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
LCA मार्क-2 आणि AMCA साठी मोठी योजना
भारत आणि GE यांच्यात आणखी एका मोठ्या डीलवर चर्चा सुरू आहे. यामध्ये GE-414 इंजिन तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारतात तयार होणार आहेत. ही डील सुमारे 1.5 बिलियन डॉलर (12,500 कोटी रुपये) इतकी असून, तिच्यावर पुढील काही महिन्यांत सही होण्याची शक्यता आहे. या इंजिनांचा वापर LCA Mark-2 आणि AMCA (Advanced Medium Combat Aircraft) प्रकल्पांसाठी होणार असून, 200 पेक्षा जास्त इंजिन भारतात येणार आहेत.
MiG-21 ची जागा घेणार तेजस
भारत आपले जुने MiG-21 आणि MiG-29 फायटर जेट हळूहळू सेवामुक्त करून त्याऐवजी स्वदेशी तेजस विमानांचा ताफा उभा करत आहे. तसेच, भारत स्वतःचे इंडिजिनस फाइटर जेट इंजिन (Indigenous Fighter Jet Engine) विकसित करण्यासाठी फ्रान्सच्या Safran कंपनीसोबतही करार केलेला आहे.
भारत आणि अमेरिकेतील डिफेन्स डील्समुळे भारतीय वायुसेना जगातील अत्याधुनिक लढाऊ विमानांनी सज्ज होणार आहे. चीन-पाकिस्तानसारख्या शेजारी देशांसमोर आपली सैनिकी ताकद वाढवण्यास भारताला मदत होणार आहे.
ही बातमी वाचा:






















