एक्स्प्लोर
Advertisement
नसीरुद्दीन शाहांना त्रास दिला जातोय : अमर्त्य सेन
नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी नसीरुद्दीन शाहांचे समर्थन केले आहे. सेन म्हणाले की, "नसीरुद्दीन यांना काही लोकांकडून जाणीवपूर्वीक त्रास दिला जात आहे."
कोलकाता : "मला माझ्या मुलांना भारतात ठेवायची भीती वाटते", असे वक्तव्य करुन वादात अडकलेले अभिनेते नसीरुद्दीन शाहांवर टीका सुरु आहे. तर काही जणांनी त्यांच्या समर्थनार्थ पाऊल उचलले आहे. त्यामध्ये आता नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांची भर पडली आहे. सेन यांनी शाहांचे समर्थन करत म्हटले आहे की, "नसीरुद्दीन यांना काही लोकांकडून जाणीवपूर्वीक त्रास दिला जात आहे."
अमर्त्य सेन म्हणाले की, "अभिनेते, कलाकारांना त्रास देणाऱ्यांविरोधात आपण आवाज उठवायला हवा. देशात जे काही होत आहे, ते खूप भयानक आहे. हे थांबवायला हवं." नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यानंतर देशभरात मोठ गदारोळ माजला. अनेकांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवला. दरम्यान नसीर यांचे अनेकांनी समर्थनही केले.
भारतातील सद्यस्थितीबद्दल अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, "समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटते." काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. या घटनेवर देखील शहा यांनी भाष्य केलं आहे.
शहा म्हणाले होते की, "आपल्या देशात गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते, त्यांना या देशात ठेवण्याची भीती वाटते'
संबधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement