एक्स्प्लोर

घनकचरा व्यवस्थापनाबाबत उदासीन, महाराष्ट्रासह काही राज्यात बांधकामांना बंदी

सुप्रीम कोर्टाने घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस धोरण होत नाही, तोपर्यंत काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दणका देत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घातली आहे.

नवी दिल्ली : एकीकडे बांधकामं वेगाने सुरु आहेत, तर घनकचरा व्यवस्थापनाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय. यामुळे सुप्रीम कोर्टाने घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस धोरण होत नाही, तोपर्यंत काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दणका देत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घातली आहे. ''राज्यातील लोकांचं हित लक्षात घेता स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यांचं ठोस धोरण असणं गरजेचं आहे. मात्र आदेश देऊन दोन वर्ष झाली तरीही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोणतंही धोरण आखलेलं नाही हे अत्यंत दयनीय आहे,'' अशा शब्दात न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी राज्यांवर ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 9 ऑक्टोबरला होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठोस धोरण आखलं जात नाही, तोपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी असेल, असा आदेश कोर्टाने दिला. शिवाय हा आदेश देतानाच, महाराष्ट्र, चंदीगड, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने वकिलाद्वारे सुप्रीम कोर्टात आपली बाजू न मांडल्याने आंध्र प्रदेश सरकारला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ''काही राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी अजूनही घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत धोरण आखलेलं नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकांनी घाण आणि कचऱ्यातच रहावं अशी तुमची इच्छा असेल, तर आम्ही काहीही करु शकत नाही, अशा तीव्र शब्दात सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त करत पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. 2015 मध्ये दिल्लीत एका सात वर्षीय मुलाचा डेंगीने मृत्यू झाला. पाच खासगी रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याने या मुलाला आपला जीव गमवावा लागला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनीही आत्महत्या केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुमोटो दाखल करुन घेतली आणि या संबंधीच्या सुनावणीदरम्यान घनकचऱ्याचा, अस्वच्छतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात चर्चेस आला. बांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार : महाराष्ट्र सरकार "राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनासंबंधीचे धोरण यापूर्वीच आखले असून त्यानुसार नियम तयार करण्यात आले आहेत. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून राज्यातील गृहसंकुले व इतर बांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयास करण्यात येणार आहे.", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिवाय, याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget