एक्स्प्लोर
गुजरात, हिमाचलनंतर सर्वांची नजर आता कर्नाटकवर
गुजरात, हिमाचलनंतर पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बंगळुरु : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. आता पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
''गुजरात आणि हिमाचलच्या निकालाचा परिणाम एप्रिल-मे 2018 मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर दिसून येईल. जनतेने काँग्रेसच्या भ्रष्ट धोरणाला नाकारलं आहे'', असं भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसकडे सध्या असलेल्या मोठ्या राज्यांपैकी कर्नाटक एक आहे. पंजाबमध्येही काँग्रेस सध्या सत्तेत आहे. त्यामुळे आता भाजप काँग्रेसमुक्त भाजपसाठी कर्नाटकची तयारी आतापासूनच सुरु करणार असल्याचं येडीयुरप्पा यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे.
भाजपने कर्नाटकमध्ये 2008 साली स्वबळावर सत्ता मिळवली होती. मात्र 2012 साली भाजप नेतृत्त्वात विभाजन झाल्यानंतर 2013 साली भाजपचा पराभव झाला. येडीयुरप्पा यांनी 2012 साली भाजपमधून बाहेर पडत स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती. मात्र ते नंतर पुन्हा भाजपात सहभागी झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement