एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अकोला 'हॉट', देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद
मागील काही दिवसांपासून उत्तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारताच्या बऱ्यात भागांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आलं.
मुंबई : हवामान बदलाचा परिणाम भारताच्या बहुतांश भागात दिसत आहे. वेळेआधीच देशभरात उष्णतेने आपला परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे.
आज (3 मार्च) महाराष्ट्रातील अकोला शहर देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरलं. इथे सर्वोच्च तापमान 39.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.
अकोल्याशिवाय महाराष्ट्रातील ब्रह्मापुरी, जळगाव, परभणी आणि वर्धा इथेही 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
मागील काही दिवसांपासून उत्तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारताच्या बऱ्यात भागांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आलं. गुजरातपासून कर्नाटकपर्यंत दिवसाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला होता.
भारतातील सर्वात उष्ण दहा ठिकाणांवर एक नजर
अकोला महाराष्ट्र 39.5
ब्रह्मापुरी (चंद्रपूर) महाराष्ट्र 38.9
भद्राचलम तेलंगणा 38.8
जळगाव महाराष्ट्र 38.8
नंदिगामा आंध्र प्रदेश 38.8
www.abpmajha.in
रामगुंडम तेलंगणा 38.8
अंगुल ओदिशा 38.7
निजामाबाद तेलंगणा 38.5
परभणी महाराष्ट्र 38.5
वर्धा महाराष्ट्र 38.5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement