व्हिडीओ स्ट्रीमिंग, व्हॉईस कॉलमध्ये एअरटेल नेटवर्कचं बेस्ट : ओपन सिग्नल
पल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी सध्या अनेक नागरिक व्हिडीओ, व्हॉईस कॉलचा वापर करत आहेत. या काळात जे ग्राहक एअरटेल वापरत आहेत.
मुंबई : संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. लॉकडाऊनचे पालन करून देशातील नागरिक देखील यामध्ये योगदान देत आहेत. लॉकडाऊनमुळे मोबाईल हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनला असून सध्या याचा वापर अधिक वाढला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी सध्या अनेक नागरिक व्हिडीओ, व्हॉईस कॉलचा वापर करत आहेत. या काळात जे ग्राहक एअरटेल वापरत आहेत. त्यांचा अनुभव सर्वोत्तम असल्याचा दावा मोबाईल सेवांचे विश्लेषण करणाऱ्या ओपन सिग्नलने केला आहे.
व्हिडीओमध्ये एअरटेलचा अनुभव उत्कृष्ट
ओपनसिग्नलने दिलेल्या रिपोर्टनुसार मोबाईलवर व्हिडीओ पाहण्यासाठी एअरटेलचे नेटवर्क उत्तम आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत एअरटेलच्या कनेक्शनवर व्हिडीओ विनाअडथळा फास्ट पाहता येतात. एवढचं नाही तर व्हिडीओ पाहताना कोणत्याही बफरिंगचा सामना करावा लागत नाही. दुसऱ्या सेवा पुरविणाऱ्या मोबाईल कंपन्याचा विचार केला तर ओपनसिग्नलच्या रिपोर्टमध्ये त्यांना फेअर कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, इतर कंपन्याचे नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना हाय क्वॉलिटीचे व्हिडीओ पाहताना समस्यांचा सामना करावा लागतो. ओपनसिग्नलने दिलेल्या माहितीनुसार एअरटेल व्हिडीओच्या बाबतीत इतर कंपन्यांपेक्षा अग्रेसर आहे. रिपोर्टमध्ये एअरटेलने फेअर (40-55) या कॅटेगरीतून गुड (55-65) या श्रेणीत स्थान मिळवले आहे. ही वाढ कोणत्याही टेलिकॉम कंपन्यांसाठी सर्वात मोठी आहे.
व्हॉईस कॉलमध्ये एअरटेल पुढे
व्हॉईस कॉलमध्ये देखील एअरटेल चांगली कामगिरी करत असल्याचं ओपनसिग्नलने म्हटले आहे. व्हॉईस कॉल करताना एअरटेल संदर्भात ग्राहकांनाअडचण नसल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. यामध्ये इतर सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना poor कॅटेगरिमध्ये टाकले आहे. याचा अर्थ असा होतो की, इतर कंपन्यांच्या व्हॉईस कॉल सेवेशी ग्राहक समाधानी नाही. त्यांना कॉल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. फोनवर बोलताना अचानक कॉलड्रॉप होण्याचे प्रमाण, आवाज स्पष्ट न येणे आदी गोष्टींचा विचार करून रेटिंग दिले जाते.
डाऊनलोडिंग स्पीडमध्ये एअरटेलचं अग्रेसर
डाऊनलोडिंग स्पीडमध्ये एअरटेल ग्राहकांचा अनुभव चांगला आहे. ओपनसिग्नलने दिलेल्या रिपोर्टनुसार, एअरटेलच्या ग्राहकांना सध्या 10.1 Mbps स्पीड मिळत आहे. इतर नेटवर्कच्या तुलनेत यामध्ये एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी चांगले काम करत आहे.
लॅटेन्सी अनुभव
एखाद्या अॅपवर क्लिक केल्यानंतर प्रत्युत्तर येण्यासाठी जो वेळ लागतो त्याला लॅटेन्सी एक्सपिरिअन्स म्हणतात. म्हणजे जेवढी कमी लॅटेन्सी तेवढे तुमचे नेटवर्क चांगले. एअरटेल या श्रेणीत अव्वल स्थानी असून एअरटेलची लॅटेन्सी 54.1 मिली सेकंद आहे. या कॅटेगरीमधील दुसऱ्या क्रमांकावरील नेटवर्कची लॅटेन्सी 56.3 मिली सेकंद आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील लॅटेन्सी 60.6 मिली सेकंद आहे.