विमानाचा अपघात झाला तरी मृत्यू होणार नाही? 'या' देशानं टाकलं पुढचं पाऊल, काय आहे प्रवाशांचे प्राण वाचवणारी डिटेचेबल केबिन सिस्टम?
विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठ दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता विमान अपघात झाला तरी प्रवाशांचे प्राण वाचवता येणार आहेत.

Air india plane crash : प्रवासाच्या सर्वात सुरक्षित मार्गांपैकी एक हवाई प्रवास मानला जातो. पण जेव्हा जेव्हा विमान अपघाताची (Air india plane crash ) बातमी येते तेव्हा जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. 12 जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात (Ahmedabad plane crash) एकूण 270 जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी विमानातील एकूण 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. पण विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठ दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता विमान अपघात झाला तरी प्रवाशांचे प्राण वाचवता येणार आहेत.
जगभरातील शास्त्रज्ञ विमान अपघात झाला तरी प्रवाशांचे प्राण कसे वाचवता येतील? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या दिशेने मोठे यश मिळाले आहे. रशियाचा कट्टर शत्रू असलेल्या युक्रेनमधील (Ukraine) एका अभियंत्याने विमान अपघात होऊनही प्रवाशांचे प्राण वाचवू शकणारी एक प्रणाली विकसित करण्याचे काम सुरु केले आहे. त्याला डिटेचेबल केबिन सिस्टम (detachable cabin system) म्हणतात. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
नेमकी काय आहे डिटेचेबल केबिन सिस्टम?
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या डिटेचेबल केबिन सिस्टमवर काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की जर विमान अपघात झाला तर केबिन विमानापासून वेगळे होईल. यानंतर, प्रवासी पॅराशूटच्या मदतीने हळूहळू विमानातून खाली उतरतील. जरी हे सध्या चित्रपटातील कथेप्रमाणे वाटतं असलं तरी, त्यावर काम सुरु आहे. ते विकसित करण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती सांगितली जात आहे. ही सिस्टम अशा प्रकारे डिझाइन केले जात आहे की जर इंजिन काम करणे बंद झाले, क्षेपणास्त्र हल्ला झाला किंवा विमानात तांत्रिक बिघाड झाला तर कोणताही धोका निर्माण होईल. अशा परिस्थितीत, केबिनचा भाग मुख्य विमानापासून वेगळा होईल. ते वेगळे होताच, त्याला जोडलेले शेकडो पॅराशूट आपोआप उघडतील आणि नंतर केबिन सुरक्षित पाण्यात आणि नंतर एखाद्या सुरक्षित ठिकाणी उतरवले जाईल.
युक्रेनियन ज्या कंपनीत डिटेचेबल केबिन सिस्टम बनवण्याची चर्चा केली जात आहे, त्या कंपनीने अद्याप याबाबत अधिकची माहिती दिलेले नाही. ही कल्पना प्रत्यक्षात आल्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय नियमांची मान्यता, अनेक चाचण्या आणि त्यात किती खर्च येतो अशा अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळं प्रत्यक्षात डिटेचेबल केबिन सिस्टम यशस्वी झाल्यानंतरच याबाबत अधिकची माहिती मिळेल.
महत्वाच्या बातम्या:






















