एक्स्प्लोर

Ahmedabad Plane Crash: इंजिन खराब झालं की इमारतीला धडकलं? लंडनला निघालेलं विमान कसं क्रॅश झालं

Ahmedabad Plane Crash: दुसऱ्या बाजूला काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमानाने एका इमारतीला धडक दिल्यानंतर त्यात भीषण स्फोट होऊन ते पूर्णतः जळून खाक झालं.

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरात एअर इंडियाच्या विमानाचा भीषण (Ahmedabad Plane Crash) अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या या विमानात एकूण 242 प्रवासी होते. टेकऑफनंतर अवघ्या 5 मिनिटांतच हे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेमुळे परिसरात आगीचे आणि धुराचे लोट पसरल्याचे दिसून येत आहेत. या अपघाताची दोन संभाव्य कारणे देखील समोर येत आहेत. पहिलं कारण म्हणजे विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या बाजूला काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमानाने एका इमारतीला धडक दिल्यानंतर त्यात भीषण स्फोट होऊन ते पूर्णतः जळून खाक झालं.(Ahmedabad Plane Crash)

अपघातानंतर बचाव कार्य वेगानं सुरू करण्यात आलं आहे. अग्निशमन दल, पोलीस, आणि वैद्यकीय पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. विमानाचा अपघात इतका तीव्र होता की, ते धावपट्टीवरून घसरत शेजारील मैदानात आदळलं. संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विमान अपघाताची संपूर्ण चौकशी सुरू करण्यात आली असून, एअर इंडियाने देखील यावर लवकरच माहिती समोर येईल.

विमानाचे बहुतेक भाग जळून राख झाले आहेत. विमान ज्या इमारतीवर पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. या घटनेत अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त होते आहे. विमानतळाजवळ सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.

विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात काळा धूर निघताना दिसत आहे. घटनास्थळी आपत्कालीन पथक तैनात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. मेघनीनगर परिसरातील धारपूर येथून मोठे धुराचे लोट वरती जाताना दिसत आहेत. बीएसएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना अपघातस्थळी पाठवण्यात आले आहे. अपघातग्रस्त विमान बोईंगचे 787 ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे, जे 11 वर्षे जुने होते.

अहमदाबादच्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. एअर इंडियाचे विमान कोसळले ज्यामध्ये 242 लोक होतेएअर इंडिया एआय 171 अहमदाबादहून लंडनला जात होते. 1.17 वाजता या विमानाने उड्डाण केले. त्यानंतर काही वेळातच विमान कोसळले या घटनेत जवळपासच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे.  सगळीकडे गोंधळाचे वातावरण आहे, हा भयानक अपघात पाहून लोक घाबरले आहेत आणि इकडे तिकडे धावत आहेत. विमान कोसळलेली इमारत पूर्णपणे खराब झाली आहे. विमानाचे बहुतेक भाग जळून राख झाले आहेत. विमान ज्या इमारतीवर पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. विमानतळाजवळ एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.

आज(गुरूवारी, ता, 12) रोजी अहमदाबाद येथे मेसर्स एअर इंडियाच्या बी787 विमान व्हीटी-एएनबीला अपघात झाला. आज अपघात झाला त्यावेळी मेसर्स एअर इंडियाचे बी787 विमान व्हीटी-एएनबी अहमदाबादहून AI-171 उड्डाण करत असताना (अहमदाबाद ते गॅटविक) उड्डाण केल्यानंतर लगेचच क्रॅश झाले. विमानात 242 लोक होते ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली उड्डाण करत होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीचे 8200 तासांचा अनुभव असलेले विमानचालक आहेत. सह-वैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.

एटीसीनुसार, विमान अहमदाबादहून 1.39 भारतीय वेळेनुसार (0809 यूटीसी) धावपट्टी 23 वरून निघाले. त्यांनी एटीसीला मेडे कॉल दिला, परंतु त्यानंतर एटीसीने केलेल्या कॉलला विमानाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. रनवे 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातस्थळावरून प्रचंड काळा धूर येत असल्याचे दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget