एक्स्प्लोर
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : माजी वायूदल प्रमुख एसपी त्यागी अटकेत

नवी दिल्ली : बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड चॉपर घोटाळ्याचा फास माजी वायदूल प्रमुख एसपी त्यागी यांच्याभोवती आवळण्याची शक्यता आहे. एसपी त्यागी यांच्यासह भाऊ संजीव 'ज्युली' त्यागी आणि वकील गौतम खैतान यांना सीबीआयने शुक्रवारी अटक केली आहे. तिघांनाही शनिवारी कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.
3600 कोटींच्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी 580 कोटींची लाच दिल्याचं उजेडात आलं होतं. या लाचखोरी प्रकरणात एसपी त्यागी यांचा
हात असल्याचा आरोप सीबीआयकडून लावण्यात येत आहे. यापूर्वीच त्यागी यांच्या 13 नातेवाईकांविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खुद्द एसपी त्यागी सीबीआयच्या रडारवर होते. अखेर आज त्यांना भावासह अटक करण्यात आली.
काय आहे ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा?
भारतीय हवाई दलाने 2010 मध्ये इटलीच्या ऑगस्टा या कंपनीकडून 3600 कोटी रुपयात 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचा करार केला. ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार होतं. तर हवाई दलाचे प्रमुख एस पी त्यागी होते.
या व्यवहारासाठी कमीशनरुपी 10 टक्के म्हणजे सुमारे 350 कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती, असं सांगण्यात येतं.
या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. तोपर्यंत तीन हेलिकॉप्टर्स भारतात आले होते.
इटलीच्या कोर्टाने या संपूर्ण व्यवहारात 125 कोटी रुपयांची लाचखोरीचा प्रकार घडल्याचा ठपका ठेवला आहे. ऑगस्टा वेस्टलँड आणि ‘फिनमेक्कनिका’ या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या प्रमुखांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इटलीच्या न्यायालयाने याप्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या प्रमुखाला शिक्षा ठोठावल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेला आलं आहे. या कंपनीच्या प्रमुखाने या व्यवहारासाठी भारतात लाच दिल्याचा आरोप आहे.
महत्त्वाचं म्हणजे भारतात कोणाला लाच दिली हे अद्याप समोर आलं नसलं तरी कोर्टाने चार वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
