एक्स्प्लोर

Agnipath Scheme : मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन, 20 प्रमुख शहरांमध्ये  पत्रकार परिषदांचं आयोजन

अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. ठिकठिकाणी याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. आता यामध्ये काँग्रेस देखील सहभागी झाली आहे.

Agnipath scheme :  लष्कर भरतीसाठी केंद्र सरकाकडून घोषणा करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. ठिकठिकाणी याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. देशभरातील युवक रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत आहेत. यामध्ये काँग्रेस देखील सहभागी झाली आहे. काँग्रेसनंही या योजनेला मोठा विरोध केला आहे. दरम्यान, आता काँग्रेसनं या योजनेच्या विरोधात देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून काँग्रेस देशातील 20 प्रमुख शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेणार आहे. मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस रणनिती करत असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, उद्या (27 जून) देशभरातील प्रत्येक विधानसभेत काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन अग्निपथ योजनेला विरोध करणार आहेत. आज लखनौमध्ये पक्षाचे बडे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच देशातील 20 शहरांमध्ये देखील हे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये अजय माकन, डेहराडूनमध्ये मानवेंद्र सिंह, जयपूरमध्ये दीपेंद्र हुडा, चेन्नईमध्ये गौरव गोगोई, पटनामध्ये कन्हैया कुमार, शिमल्यात आलोक शर्मा आणि इतर अनेक नेते सामील होणार आहेत.

केंद्र सरकारला अग्निपथ योजना मागे घ्यावी लागेल : राहुल गांधी

राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीच्या मुद्द्यावरुन, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत निदर्शने केली. राजकीय सुडापोटी ही कारवाई सुरु असल्याचे सांगत काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. अग्निपथ योजना ही तरुणांविरुद्ध असून, देश आणि लष्कराविरुद्ध हा धोका असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारला ही योजना मागे घ्यावीच लागेल असेही त्यांनी सांगितलं.

भारत सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. खास करुन उत्तर भारतात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि आसाममध्ये तरुणांनी या योजनेला विरोध केला आहे. अनेक ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरुन त्याविरोधात घोषणाबाजी आणि जाळपोळ केली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी सुविधाही दिल्या जाणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलंAjit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHADevendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्यMahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Embed widget