एक्स्प्लोर
सीमेजवळची हजार गावं रिकामी, रुग्णालयंही सज्ज
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या यशस्वी सर्जिकल ऑपरेशननंतर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाब सीमेजवळची सुमारे 1 हजार गावं रिकामी करण्यात आली आहेत. सुमारे दोन लाख नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. प्रशासनाने 15 लाख नागरिकांना सुरक्षीत स्थळी ठेवण्याची तयारी केली आहे.
पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, पठाणकोट, तर्णतारण, फिरोजपूर, हाजीलका या जिल्ह्यातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शाहिद आफ्रिदी म्हणतो...
यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. याशिवाय पुढील आदेश मिळेपर्यंत फिरोजपूर परिसरातल्या शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय सीमेवरच्या सैनिकांची सुट्टी रद्द करण्यात आली असून, त्यांना लवकरात लवकत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच आपत्कालीन परिस्थितीत पठाणकोठमधल्या सरकारी रुग्णालयातील एक कक्ष रिकामा करण्यात आला आहे. तसंच डॉक्टरांची सुट्टीही रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या कारवाई नंतर संतापलेल्या पाकिस्तानने भारताला उत्तर देऊ असं म्हटलं आहे. त्यामुळं सीमाभागात वातावरण चांगलचं तणावपूर्ण आहे. भारताचं सर्जिकल स्ट्राईक उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली. संबंधित बातम्या : होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाला अलर्ट दहशतवाद्यांचे मृतदेह दफन, पुरावे नष्ट करण्याचे पाकचे प्रयत्न वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले? भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती? ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला! फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement