एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तिहेरी तलाकवर काझींसाठी मार्गदर्शक सूचना, मुस्लीम लॉ बोर्डचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
नवी दिल्ली : तिहेरी तलाक प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने याबाबतचा निकाल सध्या राखून ठेवला आहे. पण दुसरीकडे मुस्लीम लॉ बोर्डाने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहं. तिहेरी तलाक टाळण्यासाठी काझींना एक मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, असं याद्वारे सांगण्यात आलं आहे.
सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकबाबतची सुनावणी 18 मे रोजी पूर्ण झाली. याप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सहा दिवस युक्तीवाद चालला. मात्र सुप्रीम कोर्टाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला आहे.
या सुनावणीदरम्यान मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं सातत्यानं तिहेरी तलाकच्या बाजूनं भूमिका मांडली. तसेच हा विषय धार्मिक आस्थेशी जोडलेला असल्याने कोर्टानं यात हस्तक्षेप करु नये, असं मत मांडलं होतं.
दुसरीकडे सुनावणीच्या शेवटच्या दिवशी बोर्डाच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी तिहेरी तलाक ही चुकीची प्रथा असल्याचं मान्य केलं. तसेच मुस्लीम समाजातील विवाहावेळी काझींना यापासून बचाव करण्यासाठी लॉ बोर्ड एक मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचं सांगितलं होतं. पण न्यायालयाने यात नेमकं काय असेल, असा प्रश्न विचारला होता.
त्यानुसार, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून, त्यात बोर्डानं आपल्या वेबसाईट, साप्ताहिक, मासिक आणि सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून देशभरातील काझींना मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. यामध्ये प्रमुख्याने दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे.
पहिलं म्हणजे, विवाहावेळी काझींनी वराला तिहेरी तलाक टाळण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत. कारण मुस्लीम धर्मातील शरियत कायद्यानुसार, चुकीचं आहे.
तसेच दुसरं म्हणजे, वधू आणि वर या दोघांनीही आपल्या निकाहनाम्यात तिहेरी तलाक न करण्याची अट समाविष्ट करण्याची काझी सूचना करतील.
याशिवाय तिहेरी तलाकसंदर्भात 16 आणि 17 मे रोजीच्या मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, इस्लाममध्ये घटस्फोटाचे मार्ग सांगितले आहेत, त्याविषयी मुस्लीम समाजात जागृती करेल. विशेष म्हणजे, तिहेरी तलाकवर मुस्लीम समाजाने बहिष्कार टाकावा, असं आवाहनही बोर्ड करणार असल्याचं या प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टाला सांगितलं आहे.
दरम्यान, तिहेरी तलाक प्रकरणातील इतर पक्षकारांच्या मते, मुस्लीम लॉ बोर्डने सुप्रीम कोर्टाच्या निकालापासून बचावासाठी शेवटची खेळी खेळली आहे.
संबंधित बातम्या
तिहेरी तलाकचा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला
तिहेरी तलाक इस्लामचा मूलभूत भाग नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात दावा
तिहेरी तलाक घटनाबाह्य कसा? कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
… तर तिहेरी तलाकसाठी केंद्र सरकार कायदा करेल!
BLOG: ‘तोंडी तलाक’ला आता न्यायाची प्रतिक्षा
‘तिहेरी तलाक’ची प्रथा सर्वात वाईट, सुप्रीम कोर्टाचं परखड मत
ट्रिपल तलाकबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, 6 दिवस युक्तीवाद चालणार
कोर्टातच बायकोला ‘ट्रिपल तलाक’ देऊन पती फरार!
‘पतीनं मनातच तलाक म्हटलं आणि मला सोडलं’, पुण्यातील महिलेची व्यथा
तीन तलाक वैध की अवैध?, सुप्रीम कोर्टात सुनावणीला वेग
चहाचा कप हातातून निसटला, पती म्हणाला तलाक…तलाक…तलाक…
मुस्लिम लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही, तोंडी तलाक क्रूरपणा: अलाहाबाद हायकोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement