एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AeroIndia 2019 : पार्किंगमध्ये भीषण आग, 300 गाड्या जळून खाक
बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या 'एअरो इंडिया 2019' या कार्यक्रमादरम्यान आज पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तिथे येणाऱ्यांसाठी मोठी पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे. या पार्किंगमध्ये आज दुपारी भीषण आग लागली.
बंगळुरु : बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या 'एअरो इंडिया 2019' या कार्यक्रमादरम्यान आज पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तिथे येणाऱ्यांसाठी मोठी पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे. या पार्किंगमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. या अगीत 300 गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
आगीची माहिती मिळताच लगेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तासाभरानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले. पार्किंगमध्ये असलेल्या सुक्या गवतामुळे आग खूप भडकली होती. ही आग पाहून 'एअर शो'च्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला होता. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जिवितहानी झाली नाही.
दोन दिवसांपूर्वी याच 'एअर शो'दरम्यान भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण टीममधील दोन हॉक विमानांमध्ये हवेतच धडक झाली होती. धडकेनंतर दोन्ही विमानं जमिनीवर कोसळली आणि जळून खाक झाली. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांत या 'एअर शो'मध्ये ही दुसरी मोठी दुर्घटना झाली आहे.
पी. व्ही. सिंधूची उपस्थिती
दरम्यान आज ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिनेदेखील एअर शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तेजस विमानाच्या उड्डाणाचा अनुभव घेतला. यावेळी भारतीय वायुदलाच्या अनेक तुकड्यांनी आपापली प्रात्यक्षिकं सादर केली. तेजस विमानाच्या तुकडीत पी. व्ही. सिंधू सहभागी झाली होती.
राफेलची थरारक प्रात्यक्षिकं पाहून उपस्थितांमध्ये जल्लोष
एकीकडे राफेल प्रकरणावरुन देशात खडाजंगी सुरु असताना बंगळुरुतल्या एअर शोमध्ये राफेल विमानाची थरारक प्रात्यक्षिकं पाहायला मिळाली. राफेलची प्रात्यक्षिकं पाहून उपस्थितांनी मोठा जल्लोष केला.
VIDEO पाहा
#WATCH Nearly 80-100 cars gutted after fire broke out in dry grass at the car parking area near #AeroIndia2019 venue in Bengaluru pic.twitter.com/xGdDKm4D3V
— ANI (@ANI) February 23, 2019
Karnataka: According to the fire department, 80-100 cars gutted in fire near the venue of #AeroIndia2019 in Bengaluru pic.twitter.com/pwpTKDzIgT
— ANI (@ANI) February 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement