एक्स्प्लोर

ADR Report: महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती 23 कोटी, कर्नाटकात 64 कोटी; ADR च्या अहवालातून स्पष्ट 

Richest MLA : देशातील 88 आमदार हे अब्जाधीश आहेत, सर्वाधिक संपत्ती असलेल्या आमदारांची संख्या ही कर्नाटकात जास्त आहे तर त्रिपुरात सर्वात कमी आहे. 

Richest MLA : राज्यातील 284 आमदारांची सरासरी संपत्ती 23.51 कोटी रुपये असल्याचं त्यांच्या निवडणूक स्वयंघोषणापत्रकातून स्पष्ट झालं आहे. तर कर्नाटकातील आमदारांची सरासरी संपत्ती ही 64.39 कोटी रुपये असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर देशातील सर्व आमदारांची सरासरी संपत्ती ही 13.63 कोटी रुपये आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR Report) आमदारांच्या घोषणापत्रकाचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. 

देशातील राज्य विधानसभेतील प्रत्येक आमदार सरासरी 13.63 कोटींचा मालक असल्याचं समोर आलं आहे. फौजदारी खटले दाखल नसलेल्या आमदारांची सरासरी मालमत्ता 11.45 कोटी रुपयांच्या तुलनेत, घोषित गुन्हेगारी प्रकरणे असलेल्या आमदारांची सरासरी मालमत्ता 16.36 कोटी रुपये आहे. 

एडीआरच्या विश्लेषणातून काय माहिती समोर आली आहे, 

कर्नाटकातील 223 आमदारांची सरासरी मालमत्ता 64.39 कोटी रुपये आहे. देशातील ही सर्वाधिक संपत्ती असलेल्या आमदारांचे राज्य आहे. 
त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशात 174 आमदारांची सरासरी संपत्ती 28.24 कोटी रुपये आहेत.
महाराष्ट्रातील 284 आमदारांची सरासरी संपत्ती 23.51 कोटी रुपये आहे. 

याउलट, त्रिपुरामध्ये 59 आमदारांची सरासरी संपत्ती 1.54 कोटी इतकी आहे. ही देशातील सर्वात कमी संपत्ती आहे.  
पश्चिम बंगालमध्ये 293 आमदारांची सरासरी संपत्ती 2.80 कोटी इतकी आहे.
केरळमधील 135 आमदारांची सरासरी संपत्ती 3.15 कोटी इतकी आहे. 

विश्लेषण केलेल्या 4,001 आमदारांपैकी 88 (2 टक्के) आमदार हे अब्जाधीश असल्याचे आढळून आले, त्यांच्याकडे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

कर्नाटकात 223 पैकी 32 (14 टक्के) आमदार अब्जाधीश असून ही देशातील सर्वाधिक संपत्ती आहे. 
त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील 59 पैकी चार आमदार (7 टक्के) अब्जाधीश आहेत.  
आंध्र प्रदेश 174 पैकी 10 (6 टक्के) आमदार अब्जाधीश आहेत.

महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातही 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले आमदार आहेत. 

ADR Report On Criminal MLA : निवडणूक प्रतिज्ञापत्रकात नमूद असलेले गुन्हे 

  • केरळमध्ये, 135 पैकी 95 आमदारांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं आहे. ही संख्या एकूण संख्येच्या 70 टक्के इतकी आहे.
  • त्याचप्रमाणे बिहारमध्ये 242 पैकी 161 आमदार (67 टक्के)
  • दिल्लीत 70 पैकी 44 आमदार (63 टक्के),
  • महाराष्ट्रात 284 पैकी 175 आमदार (62 टक्के),
  • तेलंगणामध्ये 118 पैकी 72 आमदार (61 टक्के),
  • तामिळनाडूमध्ये, 224 पैकी 134 आमदारांवर (60 टक्के) त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्वयंघोषित गुन्हेगारी प्रकरणे दाखल असल्याचं सांगण्यात आलंय. 

गंभीर गुन्हे दाखल असलेले आमदार

  • दिल्लीत 70 पैकी 37 आमदार (53 टक्के),
  • बिहारमध्ये 242 पैकी 122 आमदार (50 टक्के),
  • महाराष्ट्रातील 284 पैकी 114 आमदार (40 टक्के),
  • झारखंडमध्ये 79 पैकी 31 आमदार (39 टक्के),
  • तेलंगणात 118 पैकी 46 आमदार (39 टक्के),
  • उत्तर प्रदेशातील 403 पैकी 155 आमदार (38 टक्के)

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget