माँ तुझे सलाम! नौदल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारताना Admiral Hari Kumar यांनी घेतला आईचा आशीर्वाद
नवे नौसेना प्रमुख म्हणून अॅडमिरल आर. हरिकुमार (Admiral R Hari Kumar) यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. हरी कुमार यांनी पदभार स्विकारताच आईचा आशीर्वाद घेतला.
नवी दिल्ली : माजी नौसेना प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी भारतीय नौसेनेचा पदभार अॅडमिरल आर. हरिकुमार यांना सोपवला. यावेळी नवे नौसेना प्रमुख म्हणून अॅडमिरल आर. हरिकुमार यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. हरी कुमार यांनी पदभार स्विकारताच आईचा आशीर्वाद घेतला आहे.
नौदलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अॅडमिरल आर हरि कुमार यांनी त्यांची आई श्रीमती विजय लक्ष्मी यांचा आशीर्वाद घेतले आणि त्यांना मिठी मारली. तो एकदम भावूक क्षण सर्वांना पाहायला मिळाला. यावेळी त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. यावेळी त्यांनी देशाच्या समुद्रीसीमांच्या सुरक्षेवर आणखी भर देऊन देशसंरक्षण आणि हित जपण्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याबाबत आश्वस्त केलं.
व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार यांचा जन्म 12 एप्रिल 1962 रोजी केरळमधील त्रिवेंद्रम या ठिकाणी झाला. त्यांनी आतापर्यंत व्हॉईस ऑफ डिफेन्स स्टाप, चीफ ऑफ पर्सनल, द फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लीट या पदांवर काम केलं आहे. तसेच नेव्हल वॉर कॉलेज गोवाच्या कमांडंट पदाची जबाबदारीही त्यांनी पेलली आहे. सेशेल्स सरकारचे नेव्हल सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहे.
#WATCH Admiral R Hari Kumar takes blessings from his mother on taking charge as the new Chief of Naval Staff today pic.twitter.com/v6hsuhAhIG
— ANI (@ANI) November 30, 2021
मुंबई विद्यापीठातून त्यांनी डिफेन्स अन्ड स्ट्रॅटेजिक स्टडिज या विषयातून त्यांनी एमफिल केलं आहे. त्यांनी त्रिवेंद्रमच्या गव्हर्नमेन्ट आर्ट्स कॉलेजमधून प्रि डीग्री कोर्स पूर्ण केला. व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. आयएनएस रंजित या युध्दनौकेवर त्यांना तोफखाना प्रमुख या पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. तसेच आयएनएस विराट या युद्धनौकेवरही त्यांनी आपली सेवा बजावली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :