Adiyogi Statue : 'बम बम भोले...'; 112 फूट उंच 'आदियोगी' शिवशंकराची मूर्ती, भव्यता पाहून डोळे दिपतील
Adiyogi Statue Karnataka : मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कर्नाटकातील नंदी टेकडीच्या पायथ्याशी आदियोगी शंकराच्या 112 फूट उंच अशा भव्य मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले.
Karnataka Adiyogi Statue : कर्नाटकमध्ये (Karnataka) बम...बम...भोलेचा गजर... आदियोगी शंकराच्या (Adiyogi Shiva Statue) 112 फूट उंच मूर्तीचे कर्नाटकमध्ये अनावरण करण्यात आले आहे. कर्नाटकातील नंदी टेकडीच्या पायथ्याशी आदियोगी शंकराच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम पार पडला आहे. ही मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे स्थापन करण्यात आलेल्या आदियोगी शंकराच्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या आदियोगी मूर्तीचं अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु हेही उपस्थित होते
आदियोगी शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण
कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स येथे असलेल्या ईशा फाऊंडेशनच्या आश्रम परिसरात आदियोगी शिवशंकराची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. भारतीय कला, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांना चालना देण्यासाठी ईशा फाऊंडेशनकडून आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे. आदियोगी शंकराच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह अनेक दिग्गजांची हजेरी होती. तसेच ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव यांची कन्या राधे जग्गी यांचे भरतनाट्यम आणि केरळचे फायर डान्स थेय्यम यांचे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र होते.
त्याचवेळी या प्रकल्पाविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. अलिकडेच कर्नाटक उच्च न्यायालयाने आदियोगी शिवशंकराच्या पुतळ्याचे अनावरण आणि नंदी टेकडीच्या पायथ्याशी ईशा योग केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. ईशा योग केंद्राने सुनावणी वेळी सांगितले की, आम्ही कोणतीही जंगलतोड करणार नाही. या प्रकरणात, हायकोर्टाने म्हटले आहे की 15 जानेवारी रोजी होणाऱ्या नियोजित कार्यक्रमात सद्यस्थिती अडथळा ठरणार नाही.
आदियोगी शिवमूर्ती, तामिळनाडू
तामिळनाडूमध्ये भगवान शंकराची आदियोगी मूर्ती आहे. 112 फूट उंच मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे 2017 साली स्थापन करण्यात आली. याच मूर्तीची हुबेहुब प्रतिमा आता कर्नाटकात स्थापन करण्यात आली आहे. भगवान शंकराला आदियोगी म्हणजे प्रथम योगी असं म्हटलं जातं. ही मूर्ती तयार करण्यासाठी दोन वर्षे आणि आठ महिने कालावधी लागला. जगभरातील पर्यटकांसाठी हे एक प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थान आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Shiva Statue : जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं लोकार्पण, 369 फुटी 'विश्वास स्वरूपम'ची 'ही' आहे खासियत