एक्स्प्लोर
विद्या बालनच्या साडीवरुन उत्तर प्रदेशच्या राजकारणात घमासान

लखनौ : उत्तर प्रदेशातील अखिलेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेची ब्रँड अॅम्बेसिडर अभिनेत्री विद्या बालन हिच्या साडीवरुन आता वाद सुरु झाला आहे. विरोधी पक्षांनी विद्या बालनच्या साडीवर आक्षेप घेत आरोप केला आहे की, "सरकारी जाहिरातींमध्ये विद्या बालनने समाजवादी पक्षाच्या झेंड्याच्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि समाजवादी पक्ष सरकारी पैशांनी पक्षाचा प्रचार करत आहे."
प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनला अखिलेश सरकारने समाजवादी पेन्शन योजनेची ब्रँड अॅम्बेसिडर बनवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एकदा खंत व्यक्त केली होती की, समाजवादी पक्षाने काम खूप केलंय. मात्र, त्या कामांचा प्रचार केला नाही. त्यानंतरी योजनेची जाहिरात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्या बालनला लोक ओळखतात आणि त्यामुळे तिच्या माध्यमातून लोकांपर्यंत सरकारची कामंही लोकांपर्यंत पोहोचवता येईल. यातूनच विद्या बालनला योजनेच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
"उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेच्या जाहिरातीत जी साडी परिधान केली आहे, त्या साडीचा रंग लाल आणि हिरवा आहे आणि हे रंग समाजवादी पक्षाच्या झेंड्याचे आहेत. त्यामुळे अखिलेश यादव आपल्या सरकारी पैशाने पक्षाचा प्रचार करत आहेत", असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
दरम्यान, "कोणत्याही रंगाची साडी कुणीही परिधान करु शकतो, असं स्पष्टीकरण मंत्री रविदास मेहरोत्रा यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यानंतर रविदास म्हणाले, "समाजवादी पक्षाचं सरकार आणि योजनाही समाजवादी पक्षाच्या सरकारने आणली आहे. तर नावही समाजवादी पक्षाचच असणार."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
