(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी: गुजरात ATS ने आरोपींना घेतले ताब्यात, ई-मेल लोकेशन ट्रेस
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना आरडीएक्सने (RDX) उडवले जाईल, असे आरोपींनी एका ई-मेलमध्ये लिहिले होते.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातील (UP) बदाऊन येथून अटक करण्यात आली आहे. ई-मेलद्वारे आरोपींनी ही धमकी दिली होती. पंतप्रधान मोदींना आरडीएक्सने (RDX) उडवले जाईल, असे आरोपींनी ई-मेलमध्ये लिहिले होते. गुजरात एटीएसने (Gujarat ATS) या आरोपीला अटक केली आहे. कथित धमकीच्या ई-मेलचे लोकेशन ट्रेस करून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले.
एक तरुणी आणि गुजरातमधील एका तरुणाचेही नाव समोर
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने अटक केलेला आरोपी हा बदायूंमधील आदर्श नगर परिसरातील रहिवासी आहे. गुजरात एटीएसने शनिवारी (26 नोव्हेंबर) रात्री आधी आदर्श नगर गाठले, नंतर ई-मेल ट्रेस करून आरोपीला अटक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावल्याच्या आरोपाखाली आरोपी अमन सक्सेनाला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणी एक तरुणी आणि गुजरातमधील एका तरुणाचेही नाव समोर आले आहे. गुजरात एटीएस या सर्वांचा शोध घेत होती. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पथकाने अमनला सोबत घेतले.
गुजरात एटीएसचे पथक रात्री दहा वाजता पोहोचले
गुजरात एटीएसचे निरीक्षक व्ही एन बघेला हे पथकासह रात्री दहाच्या सुमारास सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने अमन सक्सेनाला आदर्शनगरमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या आयडीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी गुजरातमधील एका तरुण आणि तरुणीचे नाव पुढे आले होते.
आरोपीचे लोकेशन ट्रेस
आरोपी अमनचे लोकेशन ट्रेस होताच हे पथक रात्री शहरात पोहोचले. आरोपी अमन सक्सेना हा काही काळापूर्वी राजर्षी कॉलेज, बरेली येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता, परंतु त्याने शिक्षण अपूर्ण सोडले. दरम्यान आरोपींनी धमकी का दिली? याचा तपास सुरू आहे. गुजरात एटीएसचे निरीक्षक व्हीएल बघेला यांनी इतर दोन आरोपींबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. एटीएस निरीक्षकासोबत आलेल्या अन्य एका सदस्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, आरोपीची चौकशी सुरू आहे. आता सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सहंसरवीर सिंग यांनी सांगितले की, एटीएसने संबंधित आरोपींना पकडले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या