एक्स्प्लोर
भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद
नवी दिल्ली: दिल्लीतील एका कार चालकानं मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमाला अक्षरश: वाऱ्यासारखं उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताची भयानक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.
कारचालक एक तरुण असून त्यानं तब्बल चार जणांना उडवल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचंही समजतं आहे.
सुरुवातीला रस्तावरुन चालत असणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला या कारनं जोरदार धडक दिली. कारनं उडवल्यानंतर हा वृद्ध जवळपास 20 फूट लांब रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या गाडीवर जाऊन आदळला. अंगावर काटा आणणारी हि दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
गाडी चालक रात्रीपासून पहाटेपर्यंत दारु पित होता आणि त्यानंतर गाडी चालवताना त्यानं चौघांना उडवलं. त्यापैकी एक घटनेची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement