Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
एकनाथ शिंदे... राज्याचे उपमुख्यमंत्री... सध्या शिंदे ब्रिटन दौऱ्यावर आहेत. ब्रिटनमध्ये शिंदेंचा वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांनी इंग्रजीत भाषणही केलं...
ठाण्यातील एका सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यापासून सुरु झालेला एकनाथ शिंदेंचा प्रवास थेट ब्रिटन संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्डसपर्यंत जाऊन पोहोचलाय... शिंदेंच्या रुपानं साहेबांच्या देशात महाराष्ट्राचा आवाज घुमला... पाहूयात याच सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...
एकीकडे विद्यानंद बापटांच्या मराठीची चर्चा
आणि आता दुसरीकडे लंडनच्या संसदेत
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी फाडफाड इंग्रजीतून दिलेल्या
भाषणाची चर्चा....
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत...
निमित्त होतं ते ब्रिटिश संसदेत आणि ब्रिटनस्थित मराठी मंडळ आयोजित
विविध पुरस्कार सोहळ्यांचं....
ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये
शिंदेंना कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन सन्मान देऊन गौरवण्यात आलं....
तर हाऊस ऑफ कॉमन्समधल्या इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये
स्टेट्समनशिप अवॉर्ड
आणि महाराष्ट्र मंडळाकडून 'ग्लोबल प्राईड
ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार देऊन
एकनाथ शिंदेंचा गौरव करण्यात आला...
पण यादरम्यान सर्वाधिक चर्चा झाली
ती शिंदेंच्या इंग्रजी भाषणाची....
या भाषणादरम्यान त्यांनी राज्यातल्या
लोकोपयोगी योजनांचाही उल्लेख केला....
यावेळी या सोहळ्याला
संसदेच्या सभागृहांचे सदस्य...
ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री... महापौर...
विविध देशांचे राजदूत, जगातले उद्योजक
आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते....
पण इंग्रजांच्या देशात जाऊन
इंग्रजीत भाषण दिलं तरी शिंदेंनी
आपला मराठी बाणा कायम ठेवला....
कपाळावर लाल टिळा लावलेल्या एकनाथ शिंदेंनी
सुरेश भटांच्या ओळींचा उल्लेख करत महाराष्ट्राची ओळखही उपस्थितांसमोर मांडली...
All Shows































