ITA Awards 2022 : इंडियन टेलिव्हिजन अकादमी (ITA) पुरस्कारांमध्ये एबीपी न्यूजला (Abp News) सर्वात लोकप्रिय हिंदी वृत्तवाहिनीचा पुरस्कार (Best Hindi News Channel) मिळाला आहे. यादरम्यान एबीपी न्यूजच्या अँकर शोभना यादव यांना सर्वोत्कृष्ट हिंदी न्यूज चॅनल अँकरचा (Best Hindi News Anchor) पुरस्कार देण्यात आला आहे. यासोबतच एबीपी न्यूजच्या 'मातृभूमी'ला सर्वोत्कृष्ट न्यूज शोचा पुरस्कार मिळाला आहे.


21 व्या इंडियन टेलिव्हिजन अकादमी (ITA) पुरस्कारादरम्यान, ABP न्यूज नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडे आणि संपादक सुमित अवस्थी यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यावेळी ते म्हणाले की, 'एबीपी न्यूज पाहिल्याबद्दल, आवडल्याबद्दल धन्यवाद.'


 


ते पुढे म्हणाले की, 'आतापर्यंत आम्ही तुमच्यासाठी पुढे होतो, पण यावेळी तुम्ही लोकांनी आम्हाला तुमच्या मतांनी पुढे आणलं आहे. आयटीए पुरस्कार मिळणे ही एबीपी न्यूजसाठी गौरवाची बाब आहे. यावेळी एबीपी न्यूज नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांनीही एबीपी न्यूजच्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.




महत्त्वाच्या इतर बातम्या:




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha