Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये कॉंग्रेल चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवत आहे. पंजाबमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षीत कऱण्यासाठी आश्वासने देत आहेत. सत्ताधारी काँग्रेस पक्षानेही मतदानापूर्वी जनतेला मोठं आश्वासन दिले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर वर्षभर मोफत आठ गॅस सिलिंडर आणि गरीब आणि गरजू महिलांना प्रत्येक महिन्याला 1100 रुपये देणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी केली आहे.
8 मोफत गॅस सिलेंडर देण्याचं आश्वासन -
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी रविवारी सांगितले की, राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आल्यास प्रत्येक वर्षी मोफत आठ गॅस सिलेंडर देण्यात येतील. त्यासोबतच गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिन्याला 1100 रुपये देण्यात येतील.
दरम्यान, शनिवार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) बरनाला येथे काँग्रेस उमेदवार मनीष बांसल यांच्या प्रचाराला गेले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, बरनाला येथे लोकांना पुन्हा काँग्रेसचीच सत्ता हवी आहे. ते या निवडणूकीत काँग्रेसला निवडूण देतील. पुन्हा एकदा राज्यात काँग्रेसचे सरकार येईल.
गेल्या निवडणुकीत बोलायचे झाले तर कॉंग्रसला 77, अकाली दलाला 15, आम आदमी पक्षाला 20, भाजपला 20 आणि इतरांना दोन जागा मिळाल्या होत्या. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय. गेले अनेक महिने या प्रचाराची जोरदार तयारी सुरू होती.. युत्या आघाड्यांपासून ते पक्षबदलांपर्यंतच्या सगळ्या घडामोडींनंतर आता प्रत्यक्ष निवडणूकांचे वेध लागला आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी 117 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तर दहा मार्च रोजी निकाल लागणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
ABP C Voter Survey : पंजाबमध्ये काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता, पाहा जनतेचा कौल
उत्तराखंडमध्ये 'काँटे की टक्कर', काँग्रेस-भाजप की आप, यंदा आकडे कुणाच्या बाजूने?