ABP News C-Voter Survey : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत (Elections) जास्तीत जास्त जागा जिंकून पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात सर्वच पक्ष व्यस्त आहेत. सध्या अनेक नेते रॅलीमध्ये संबोधित करत आहेत, तर काही नेत्यांनी आपले दौरेही आखले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठीही अनेक पक्ष, नेते प्रयत्न करत आहेत. पंजाब (Punjab) मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदी  (Pm Modi) बुधवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी योजनांचा शुभारंभ केला. तसेच, एका रॅलीलाही संबोधित केलं. या दरम्यान यावेळी काही आंदोलकांनी त्यांना विरोध केल्यानं ते रॅलीच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. आंदोलकांच्या विरोधामुळे पंतप्रधानांचा ताफा थांबला होता. 


पीएम मोदींचा ताफा थांबल्यानंतर त्यांच्या सुरक्षेबाबत देशभरात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत काही लोक याला राजकारणाशी जोडून पाहू लागले, तर काही लोक याला कटाचा भाग मानू लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते आहेत.


याच मुद्द्यावर सी-वोटरनं एबीपी न्यूजसाठी एक सर्वे केला आहे. या सर्वेमध्ये विचारण्यात आलं आहे की, पंतप्रधान मोदींची सुरक्षेत त्रुटी होत्या की, हे कटकारस्थान होतं? या प्रश्नाच्या उत्तरात 55 टक्के लोकांनी हे कटकारस्थान असल्याचं म्हटलं आहे. तर 44 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, हे राजकारण आहे. तसेच एक टक्के लोकांचं म्हणणं आहे की, हे राजकारण आणि कटकारस्थान दोन्ही आहे. 


दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भाती पंजाबमधील प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीनंतर एसपीजी आणि आयबीनेही या घटनेच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन्ही एजन्सी आपला तपास अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करू शकतात. या अहवालानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षा नियमांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. दुसरीकडे, केंद्रीय गृह मंत्रालय अद्याप पंजाब प्रशासनाकडून अहवाल येण्याची वाट पाहत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा