ABP C-Voter Survey for Punjab Election 2022 : उत्तर प्रदेश आणि पंजाबसोबत पाच राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अद्याप निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, मात्र प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली आहे. एबीपी न्यूजने सी-व्होटर सर्व्हेच्या माध्यमातून पंजाबमधील जनतेचा कौल जाणून घेतला आहे. सी-व्होटरचा सर्व्हे सात डिसेंबर ते 13 डिसेंबर यादरम्यान घेण्यात आला आहे. यामध्ये 5687 लोकांचं मत जाणून घेतलाय. यामधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पंजाबमध्ये केजरीवाल यांचा आप पक्ष सत्तेत यावा, असे 29 टक्के लोकांनी सर्व्हेत म्हटलेय.
पंजाबमधील निवडणूक कोण जिंकेल? असा प्रश्न सी-व्होटरचा सर्व्हेमध्ये लोकांना विचारण्यात आला होता. यामध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाला 27 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर 29 टक्के लोकांनी आप या पक्षाला निवडलं आहे. दहा टक्के लोकांना अकाली दल या पक्षाने सरकार बनवावे असं वाटतेय. भाजपला फक्त एक टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर 25 टक्केंनी सर्व्हेत काहीही म्हटलेलं नाही.
पंजाबमध्ये कुणाची सत्ता?
आप - 29%
काँग्रेस - 27%
अकाली दल - 10%
भाजप - 1%
अन्य - 1%
त्रिशंकु - 7%
सांगू शकत नाही - 25%
मुख्यमंत्री पदासाठी कुणाला पसंती?
मुख्यमंत्रिपदासाठी लोकांनी चरणजीत चन्नी यांना पहिली पसंती दर्शवल्याचं सर्व्हेमधून समोर आलेय. तर केजरीवाल यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत.
चरणजीत सिंह - 32 टक्के
अरविंद केजरीवाल - 24 टक्के
कॅप्टन अमरिंदर सिंह - 2 टक्के
सुखबीर सिंह बादल - 17 टक्के
भगवंत मान - 13 टक्के
नवजोत सिद्धू - पाच टक्के
अन्य - सात टक्के
पुढील वर्षी पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने पाज राज्यातील मतरांचा कौल जाणून घेण्यासाठी आठवड्याचा सी व्होटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल. पुढील वर्षी पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने पाज राज्यातील मतरांचा कौल जाणून घेण्यासाठी आठवड्याचा सी व्होटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल.