ABP News C-Voter Survey : नव्या वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाब ही दोन महत्वाची राज्य मानली जातात. उत्तर प्रदेशनंतर पंजाबहे सर्वात मोठं आणि महत्वाचं राज्य आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे. भाजपपासून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने प्रचाराला सुरुवात केली आहे.  त्याशिवाय प्रादेशिक पक्षांनीदेखील निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हे करत पंजाबमधील जनतेचा कौल जाणून घेतला आहे.  


कोणत्या पक्षाकडे पंजाबची सत्ता जाईल? मुख्यमंत्रिपदी कोण बसणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.  मुख्यमंत्रिपदासाठी लोकांनी चरणजीत चन्नी यांना पहिली पसंती दर्शवल्याचं सर्व्हेमधून समोर आलेय. पाहूयात सर्व्हेमध्ये काय माहिती समोर आली आहे... 


साप्ताहिक सर्व्हेच्या माध्यमातून एबीपीने मतदारांना पंजाबमध्ये कुणाचं सरकार येईल? मुख्यमंत्र्यासाठी कुणाला पसंती? असा प्रश्न विचारला होता.  पाहा काय म्हणतोय सर्व्हे....


चरणजीत चन्नी - 33 टक्के
अरविंद केजरीवाल  - 24 टक्के
सुखबीर बादल  - 17 टक्के
भगवंत मान -13 टक्के
अन्य - 6 टक्के
नवजोत सिंह सिद्धू - 5 टक्के
कॅप्टन अमरिंदर- 2 टक्के


पुढील वर्षी पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने पाज राज्यातील मतरांचा कौल जाणून घेण्यासाठी आठवड्याचा सी वोटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जाईल. या सर्व्हेमध्ये पाच राज्यातील 92 हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. पाच राज्यातील 690 विधानसभा जागेवरील लोकांचा कौल जाणून घेतलाय. हा सर्व्हे 13 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान घेण्यात आला होता. दरम्यान, वर्ष 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या पाच राज्यातील निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live