Covid 19 Corona virus Omicron : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. या सर्व वातावरणात देशात एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. देशाने कोरोना लसीकरणाचा दीडशे कोटी लसीच्या डोसचा टप्पा पार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी 1,49,57,01,483 लसीकरण पूर्ण केले आहे. ज्यामध्ये 87 कोटी 21 लाख 67 हजार 247 नागरिकांना पहिला डोस आणि 62 कोटी 35 लाख 34 हजार 236 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. गुरूवारी संध्याकाळी 7 वाजता 85 लाख 32 हजार 595 नागरिकांना लस देण्यात आली आहे.
वेगवेगळ्या वयोगटातील लसीकरणाची सध्याची परिस्थिती
1,03,88,650 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे. तर 97,32,384 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतला आहे.
1,83,86,770 फ्रंटलाइन वर्करला पहिला डोस आणि 1,69,40,293 हेल्थकेयर वर्करला दोन डोस दिले आहेत
15 से 18 वयोगचातील 1,64,98,400 पहिली डोस दिला आहे
18 से 44 वयोगटातील 50,93,37,538 नागिराकांना पहिला डोस दिला आहे. तर 34,54,67,738 नागरिकांना दोन डोस दिले आहेत.
45 से 59 वयोगटातील 19,55,74,080 नागरिकांना पहिला आणि 15,42,70,591 दोन डोस दिले आहेत
60 पेक्षा अधिक वयोगट असणाऱ्या 12,19,81,809 नागरिकांना पहिला डोस आणि 9,71,23,230 नागिराकांना कोरोनाचे दोन डोस दिले आहेत
देशात कोरोना रुग्णांमध्ये 56% नी वाढ
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. अशातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशाची चिंता आणखी वाढवली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 90 हजार 928 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 85 हजार 401 वर पोहोचली आहे. अशातच या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 876 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (बुधवारी) 19 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 4 हजार 119 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :