ABP News C-Voter Survey : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) मध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका (Assembly Election) पार पडणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पाच राज्यांमध्ये सर्व पक्षांनी कंबर कसली असून शक्तीप्रदर्शन सुरु केलं आहे. प्रचार सभांपासून बैठकांच्या सत्रांपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्यासाठी राजकीय पक्ष अनेक कार्यक्रमांचं आयोजन करताना दिसतात. दरम्यान, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव (Omicron) देशात वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे सध्या देशात तिसरी लाट येण्याची शक्यता दाट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशातच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेले नेत्यांचे दौरे आणि प्राचरसभा यांवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 


एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं यासंदर्भात एक सर्व्हे केला असून लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरद्वारे करण्यात आलेल्या सर्वेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी प्रत्येकाच्या आयुष्याचा विचार करुन नेत्यांनी आपले दौरे रद्द केले पाहिजेत, असं म्हटलं आहे, तर 78 टक्के लोकांनी रॅली आणि दौरे रद्द करावेत असं म्हटलं आहे. तर 22 टक्के लोकांनी रॅली आणि दौरे रद्द करु नयेत, असं म्हटलं आहे. 


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नेत्यांनी रॅली, दौरे रद्द करावेत? 


C-VOTER चा सर्व्हे


हो : 78%
नाही : 22%


देशातीत कोरोनाची सद्यस्थिती


रविवारी देशात 6 हजार 987 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 76 हजार 766 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 3 कोटी 42 लाख 30 हजार 354 वर पोहोचला आहे. देशात या महामारीमुळे आतापर्यंत 4 लाख 79 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच सरकारच्या वतीनं लसीकरण मोहीम आणखी जलद गतीनं करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत 141 कोटी 30 लाख लसीचे डोस देण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह