ABP C-Voter 2022 Election Survey : नव्या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजणार आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहेत. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बसपासह इतर पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सत्ता राखणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. उत्तर प्रदेशमधील राजकीय हलचालींना वेग आलाय. अशातच एबीपी न्यूजने सी-व्होटर सर्व्हेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील जनतेचा कौल जाणून घेतलाय. योगी आदित्यनाथ यांच्या कामावर उत्तर प्रदेशची जनता समाधानी आहे का? मागील पाच वर्षातील त्यांचं कामकाज कसं राहिलेय? हे एबीपी न्यूजने सी-व्होटर सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
योगी आदित्यनाथ यांचं कामकाज कसं आहे? यावर 42 टक्के लोकांनी चांगलं असल्याचं सांगितलेय. तर 38 टक्के लोकांनी खराब असल्याचं सांगितलेय. तर 20 टक्के जनतेनं सरसरी असल्याचं म्हटलेय. गेल्या सर्व्हेच्या तुलनेत आजच्या सर्व्हेमध्ये कामकाज चांगलं असलेल्यामध्ये एक टक्केंनी घसरण झाली आहे. 18 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सर्व्हेत योगींच्या कामकाजावर 43 टक्के लोकांनी समाधानी असल्याचं म्हटलं होतं.
पाहा मागील पाच सर्व्हेत लोक काय म्हणालेत?
15DEC | 16DEC | 17DEC | 18DEC | 21DEC | |
चांगलं | 43 | 43 | 43 | 43 | 42 |
सरासरी | 20 | 20 | 20 | 20 | 20 |
खराब | 37 | 37 | 37 | 37 | 38 |
योगी सरकारवर नाराज आहात, सत्ता परिवर्तन हवे आहे का? या प्रश्नावर धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 47 टक्के लोक योगी सरकारवर नाराज आहेत अन् राज्यात परिवर्तन हवे. तर 27 टक्के लोकांनी नाराज असल्याचं सांगितलं मात्र, सत्ता परिवर्तनाला नकार दिला. 26 टक्के लोकांनी नाराज नसल्याचं आणि योगींनाच पुन्हा सत्ता देण्याचं सांगितलं.
पाहा मागील पाच सर्व्हेत लोक काय म्हणालेत?
15DEC | 16DEC | 17DEC | 18DEC | 21DEC | |
नाराज, सत्ता परिवर्तन | 47 | 48 | 48 | 47 | 47 |
नाराज, सत्ता पवरिवर्तन नको | 28 | 27 | 27 | 27 | 27 |
नाराज नाही, पवरिवर्तन नको | 25 | 25 | 25 | 26 | 26 |
नोट - पुढील वर्षी पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील काही दिवसांत निवडणुकासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर एबीपी न्यूजने मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी सी व्होटर सर्व्हे सुरु केलाय. यामध्ये लोकांचा कौल जाणून घेतला जातो. या सर्व्हेमध्ये 13 हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. हा सर्व्हे 15 डिसेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान घेण्यात आला आहे. दरम्यान, वर्ष 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत.