(Source: Poll of Polls)
ABP C-Voter Survey : पंतप्रधान मोदींचं काम गुजराती लोकांना कसं वाटतं? सर्व्हेत दिलं हे उत्तर
Gujarat Opinion Poll 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीचा काउंटडाऊन सुरु झाला आहे. दोन दिवसांमध्ये गुजरातच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
Gujarat Opinion Poll 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीचा काउंटडाऊन सुरु झाला आहे. दोन दिवसांमध्ये गुजरातच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच गुजरातमधील राजकीय वातावरण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून गृहमंत्री अमित शाह गुजरातमध्ये भाजपच्या बाजूनं वातावरण निर्मिती करत आहेत. गुजरातमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजप नेते प्रयत्न करत आहेत. तर काँग्रेस पक्ष भाजपकडून सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजप आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरु असतानाच केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही प्रचाराला सुरुवात केली आहे. अरविंद केजरीवाल स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. गुजरातमधील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच एबीपी न्यूजने सी व्होटरच्या मदतीने ओपिनिअन पोल घेतला आहे.
गुजरातमध्ये घेतलेल्या ओपिनिअन पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम कसं वाटतेय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर 60 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींचं काम चांगलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर 10 टक्के लोकांनी मोदींचं काम सरासरी असल्याचे सांगितलेय. 22 टक्के लोकांना पंतप्रधान मोदींचं काम खराब वाटतेय.
गुजरातच्या लोकांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं काम करत आहेत? काय आहे लोकांचा कौल
चांगलं -60%
सरासरी -18%
खराब-22%
पंतप्रधान मोदी वारंवार गुजरात दौऱ्यावर -
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार गुजरात दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी (29 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले होते. याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा गुजरात दौऱ्यावर आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरात मॉडेलचा हवाला देत निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होम ग्राऊंड आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधानपदावर त्यांचं काम... महत्वाचं ठरते.
गुजरात (Gujarat) दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतेच सूरतमध्ये 34 हजार कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ केला होता. त्याशिवाय भावनगरमध्येही अनेक विकासकामाचं उद्घाटन केले होते. याआधीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौरा केला आहे. दरम्यान, दोन दिवसांत गुजरातमधील निवडणुकांची घोषणा होणार आहे. डिसेंबरमध्ये गुजरातमधील निवडुका होण्याची शक्यता आहे. या वर्षाअखेरपर्यंत गुजरातमध्ये कोणाचं सरकार असणार.. हे उघड होईल.
आणखी वाचा :
ABP C-Voter Survey: हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पुनरागमन करणार का? जाणून घ्या लोकांचा कल