एक्स्प्लोर

मुंबईच्या पी-नॉर्थ विभागातून जवळपास 60 ते 70 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता

मुंबईच्या एखाद्या वॉर्डमधील 60-70 पेशंट गायब असणं ही आताच्या घडीला सर्वात गंभीर बाब आहे. टेस्ट झाल्यानंतर अनेकांनी चुकीचे फोन नंबर दिलेत. तर अनेक मजूर गावी निघून गेले आहेत.

मुंबई : मुंबईच्या मालाड, मालवणीचा समावेश असलेल्याय पी उत्तर विभागातून जवळपास 60 ते 70 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची टेस्ट झाल्यानंतर पॉझिटिव्ह पेशंटला महापालिका प्रशासनाकडून संपर्क केला जातो. मात्र, पी उत्तर विभागातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या अनेकांशी संपर्कच होत नाही, हे लक्षात आल्यानंतर या गायब पेशंटना शोधण्यासाठी पोलिसांच्या मदतीनं शोध मोहिम सुरु केली गेली आहे.

मुंबईची पश्चिम उपनगरं आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. विशेषत: मालाड, बोरिवली, कांदिवली, दहिसरमध्ये कोरोनाची रुग्णणंख्या वेगानं वाढत आहे. यासाठी नुकताच मुंबई महापालिका आयुक्तांनी खास पश्चिम उपनगरं आणि उत्तर मुंबईसाठी वेगळा अॅक्शन प्लान तयार करुन मिशन झिरोची घोषणा केली. मात्र, आता याच नव्या हॉटस्पॉटमध्ये हा प्लान राबवण्यापूर्वीच धक्कादायक माहिती समोर येते आहे. मुंबईतल्या मालाड, मालवणीचा समावेश असलेल्याय पी उत्तर विभागातून जवळपास 70 ते 70 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट बेपत्ता असल्याचं समोर येत आहे. या भागाचे आमदार अस्लम शेख यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

मुंबईच्या एखाद्या वॉर्डमधील 60-70 पेशंट गायब असणं ही आताच्या घडीला सर्वात गंभीर बाब आहे. टेस्ट झाल्यानंतर अनेकांनी चुकीचे फोन नंबर दिलेत. तर अनेक मजूर गावी निघून गेले आहेत. त्यामुळे त्यांना शोधणं मुश्कील झालंय. म्हणूनच त्यासाठी आता पोलिसांची मदत घेतली जात आहे.

मात्र, बेपत्ता असलेल्यांच्या यादीमध्ये काही मृतांची नावे आहेत. तर काही कोरोनामुक्त झालेल्यांचीही नावे आहेत. महापालिकेच्या यंत्रणेत समन्वय नसल्यानं हा गोंधळ असल्याचा दावा भाजपचे प्रभाग समिती अध्यक्ष आणि नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे. त्यामुळे या बेपत्तांच्या यादीतही बराचसा घोळ असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोना पॉझिटिव्ह पेशंट जर बेपत्ता राहत असतील आणि योग्य वेळेत त्यांच्यावर उपचार होत नसतील तर कोरोना संक्ररमणाचा धोका वाढतो, हे वेगळं सांगायला नको. पण, आता अशा बेपत्ता पेशंटवरुनही राजकारण रंगताना दिसत आहे. कोरोनावर मात करायची असेल तर फक्त तोंडानं आम्ही कोरोनाला हरवणार असं म्हणून चालत नाही. त्यासाठी प्रशासकिय यंत्रणांचा समन्वय आणि सोबतच सकारात्मक लोकसहभागही महत्वाचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Apps : 'केवळ पाहू नका, तर तक्रार करा! FSSAI चे ग्राहकांना आवाहन; असुरक्षित अन्न आणि अस्वच्छ किचन दिसताच थेट ॲपद्वारे करता येणार तक्रार
'केवळ पाहू नका, तर तक्रार करा! FSSAI चे ग्राहकांना आवाहन; असुरक्षित अन्न आणि अस्वच्छ किचन दिसताच थेट ॲपद्वारे करता येणार तक्रार
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

व्हिडीओ

Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका, नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
England sacked Test coach Brendon McCullum : आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?
आधी बेन स्टोक्स गेला... आता ब्रेंडन मॅक्युलमची कोचपदावरून हकालपट्टी, इंग्लंड क्रिकेटच्या निर्णयाने जगभरात खळबळ, नेमकं काय कारण?
Vinayak Raut Gitesh Raut Girija Raut Marathi News: विनायक राऊत आणि कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; दोन भोंदूबाबा फरार, एकला अटक; सूनेच्या आरोपानंतर काय काय घडलं?
विनायक राऊत आणि कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; दोन भोंदूबाबा फरार, एकला अटक; सूनेच्या आरोपानंतर काय काय घडलं?
Embed widget