ABG Bank Fraud Case: बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळ्याप्रकरणी (22842 कोटी रुपये) आठ आरोपींच्या विरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस जारी केली आहे मात्र काही राज्यांनी CBIच्या तपासाला दिलेली सर्वसाधारण संमती काढून घेतल्याने अनेक अडचणी येत असल्याचा गंभीर आरोप सीबीआयनं काही राज्य सरकारांवर केला आहे. एबीजी शिपयार्डप्रकरणी सीबीआयकडून सविस्तर प्रेस रिलीज जारी करण्यात आली आहे. या प्रकरणी संचालक ऋषी अग्रवाल आणि 8 आरोपींविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आली असून सर्व आरोपी भारतातच असल्याची माहिती आहे.
12 फेब्रुवारी रोजी 12 ठिकाणी सीबीआयकडून धाडसत्र टाकण्यात आले. यात कंपनी खात्यांची पुस्तके, खरेदी-विक्रीचा तपशील, विविध कराराच्या फाइल्ससोबतच अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
एबीजी शिपयार्ड कंपनीकडून अनेक नियमबाह्य कामं, बॅंकांची कर्ज परदेशात वळवत तिथे मोठी गुंतवणूक, काही जणांच्या नावे मोठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी वळवण्यात आल्याचा आरोप आहे. सीबीआयला सुरुवातीच्या तपासात असं लक्षात आलं की 2005 ते 2012 हा कालावधी गंभीर असून मोठी आर्थिक अनियमितता आहे.
सीबीआयने पत्रकात असंही म्हटलंय की, त्यांना अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची नोंद करण्यात अडचण येत आहे. कारण काही राज्यांनी सीबीआयच्या चौकशीतून सर्वसाधारण संमती (जनरल कंसेन्ट) काढून घेतली आहे. काही राज्यांनी सीबीआयच्या तपासाला दिलेली सर्वसाधारण संमती काढून घेतल्याने अनेक अडचणी येत आहेत असा गंभीर आरोप सीबीआयनं राज्य सरकारांवर केला आहे.
सीबीआयनं हे देखील नमूद केलंय की, काही राज्यांनी सीबीआय तपासासाठी सामान्य संमती मागे घेतल्याने बँक फसवणूक प्रकरणांची नोंदणी अधिक आव्हानात्मक झाली आहे असं म्हणत सीबीआयनं महाराष्ट्राकडे सूचक इशारा केला आहे.
ABG शिपयार्डने गुजरातमधील तब्बल 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. सीबीआयच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बँक घोटाळा आहे. यावर सीबीआयकडून तपास सुरु आहे. एबीजी शिपयार्ड कंपनीने सर्व नियमांना फाटा देत अनेक बँकांमध्ये फसवणूक केली आहे. फक्त बँकच नाही तर एलआयसीलाही चुना लावला आहे.
संबंधित बातम्या
Bank Scam : बॅंक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, 28 बॅंकांना 22,842 कोटींचा गंडा : Special Report