Retail inflation : देशात गेल्या महिन्यात महागाई (inflation) आणखी भडकली. महागाईनं गेल्या सात महिन्यांचा उच्चांक गाठलाय. विशेष म्हणजे यावेळी महागाईची झळ शहरांपेक्षा गावांमध्ये जास्त आहे. एकीकडे इंधनानं महागाईचा भडका आधीच उडाला होता. त्यात साखरेच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाच्या जगण्यातली गोडी कमी केलीय. मसाल्यांच्या किंमती वाढल्यानं महागाईचा जाळ सामान्यांना अधिकच त्रासदायक ठरला आहे.
किरकोळ महागाईचा दर जानेवारी महिन्यात 6 टक्क्यांवर गेला आहे. त्यात ग्रामीण भागात हा दर 6.12 टक्के इतका आहे, तर शहरांमध्ये महागाईचा दर 5.91 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात महागाईचा दर 6.68 टक्के इतका झालाय. डिसेंबरमध्ये महागाईचा दर 5.66 टक्के इतका होता. तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हाच दर 4.06 टक्के इतका होता.
पुढील काही महिन्यात महागाई वाढताना दिसत आहे. महागाई कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या अनुमानानुसार चालू वर्षातील चौथ्या तिमाहीत महागाईचा दर 5.7 टक्के एवढा ठेवला आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत 5 टक्के एवढा आहे. तर तिसऱ्या तिमाहीत 4 टक्के असून कमी होताना दिसला आहे.
कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर चहा, खाद्य तेल आणि डाळ अशा दैनंदिन वापरातील पदार्थांच्या किंमतीमध्ये 20 ते 40 टक्के वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 च्या तुलनेत जानेवारी महिन्यात 2022 महिन्या धान्य, अंडे आणि दूधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ज्यामुळे महागाईमध्ये वाढ झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Share Market: अमेरिकेत विक्रमी महागाई.... फटका भारतीय शेअर बाजाराला, रुपयाही घसरला
Bicycles Price Rise : महागाईची झळ सायकलींपर्यंत; 25 ते 50 टक्क्यांनी किमतीत वाढ