Bank Fraud Cases India : गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल 28 बँकांना शिपयार्ड कंपनीनं 22 हजार 842 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ABG शिपयार्ड (ABG Shipyard) ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचं काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे.
एसबीआयने केलेल्या तक्रारीनुसार, शिपयार्ड कंपनीने एसबीआय बँकेचे 7089 कोटी, आयडीबीआय बँकेचे 3634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोद्याचे 1614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेचे 1244 कोटी रुपये आणि 1228 कोटी रुपये इंडियन ओवरसीज बँकेकडून घेतले आहेत. याआधी 8 नोव्हेंबर 2019 रोजी बँकेकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर सीबीआयने 12 मार्च 2020 रोजी स्पष्टीकरण मागवले होते. ऑगस्ट 2020 मध्ये बँकेकडून आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. जवळपास दीड वर्षांपेक्षा जास्त तपास केल्यानंतर सात फेब्रुवारी 2022 रोजी सीबीआयने कारवाई सुरु केली.
एसबीआयच्या डीजीएमने गुजरातमधील अनेक कंपन्यावर 22842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. हा घोटाळा आतापर्यंतच्या बँक घोटाळ्यातील सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. कारण हा घोटाळा नीरव मोदींपेक्षाही मोठा आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनेशनल या घोटाळा करणाऱ्या दोन प्रमुख कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या एकाच ग्रुपच्या आहेत.
एसबीआयच्या डीजीएमने गुजरातमधील अनेक कंपन्यावर 22842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. हा घोटाळा आतापर्यंतच्या बँक घोटाळ्यातील सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. कारण हा घोटाळा नीरव मोदीपेक्षाही मोठा आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनेशनल या घोटाळा करणाऱ्या दोन प्रमुख कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या एकाच ग्रुपच्या आहेत.
एनपीए झाल्यानंतर एबीजी शिपयार्डमध्ये कोणत्या बॅंकांचं किती नुकसान?
- आयसीआयसीआय बॅंक : 7089 कोटी रुपये
- आयडीबीआय बॅंक : 3640 कोटी रुपये
- स्टेट बॅंक ऑफ इंडिया : 2943 कोटी रुपये
- बॅंक ऑफ बरोडा : 1602 कोटी रुपये
- पंजाब नॅशनल बॅंक : 1294 कोटी रुपये
- एक्झिम बॅंक ऑफ इंडिया : 1326 कोटी रुपये
- इंडियन ओव्हरसीज बॅंक : 1229 कोटी रुपये
- बॅंक ऑफ इंडिया : 768 कोटी रुपये
- ओरीयंटल बॅंक ऑफ कॉमर्स : 769 कोटी रुपये
- स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक : 743 कोटी रुपये
- सिंडिकेट बॅंक : 440 कोटी रुपये
- स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सिंगापूर : 459 कोटी रुपये
- देना बॅंक : 406 कोटी रुपये
- आंध्र बॅंक : 266 कोटी रुपये
- सीकॉम लिमिटेड : 259 कोटी रुपये
- आयएफसीआय लिमिटेड : 300 कोटी
- एसबीएम बॅंक : 125 कोटी
- फिनिक्स आर्ट प्रायव्हेट लिमिटेड : 140 कोटी
- एलआयटी : 136 कोटी
- डीसीबी बॅंक : 105 कोटी
- आर्के लॉजिस्टिक्स लिमिटेड : 95 कोटी
- पंजाब नॅशनल बॅंक (इंटरनॅशनल) लिमिटेड : 97 कोटी
- लक्ष्मी विलास बॅंक लिमिटेड : 61 कोटी
- इंडियन बॅंक : 17 कोटी
- इंडियन बॅंक, सिंगापूर : 43 कोटी
- कॅनरा बॅंक : 40 कोटी
- सेंन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया : 39 कोटी
- एस्सर प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड : 39 कोटी
- पंजाब सिंध बॅंक : 36 कोटी
- एस्सर पावर (झारखंड) लिमिटेड : 17 कोटी
- यस बॅंक : 1 कोटी 71 लाख
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा गुजरातमध्ये, 28 बँकांना 22,842 कोटींचा चुना
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा