एक्स्प्लोर

Breaking News : खासदार संजय सिंह यांना ED कडून अटक, आपच्या आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई

Sanjay Singh Arrested In Liquor scam case : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यानंतर आता आपचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कथित दारु विक्री धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने (ED) दिल्लीत आणखी एक कारवाई केली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh of AAP arrested) यांना दिल्लीतीन नवीन दारू विक्री धोरण (Delhi Liquor Policy Case) प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आज सकाळीच ईडीने त्यांच्यावर धाड टाकली होती. त्यानंतर दुपारनंतर ईडीने त्यांना अटक केली. यापूर्वी याचप्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या जेलमध्ये आहेत.

Arvind Kejriwal On ED Arrest : भाजपला पराभवाची धास्ती, केजरीवाल यांची टीका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ते  म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून तथाकथित दारू घोटाळ्याबाबत बराच गाजावाजा होत असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र भाजपला एक पैसाही मिळालेला नाही. 1,000 हून अधिक छापे टाकण्यात आले आणि कुठूनही वसुली झाली नाही. कधी शाळा साहित्य खरेदीत घोटाळा झाला, बस खरेदीत घोटाळा झाला असा आरोप भाजपने केला आहे. त्या प्रत्येक गोष्टीची चौकशी झाली. संजय सिंग यांच्याकडेही काहीही मिळणार नाही. पुढच्या वर्षी निवडणुका येत आहेत आणि भाजपला आपण हरणार आहोत असे वाटते, म्हणून हे पराभूत माणसाचे हतबल प्रयत्न वाटतात.

दिल्लीतील नवीन दारू विक्री धोरण प्रकरण नेमकं काय? What is Delhi Liquor Policy Case? 

दिल्लीतील नवीन दारु विक्री धोरण सध्या देशभरात गाजत आहे. दिल्लीतील नवीन विक्री धोरणाचं हे प्रकरण 2021 मधील आहे.सध्या जरी हे विक्री धोरण रद्द करण्यात आलं असलं तरी त्याची चौकशी आणि कारवाईचा ससेमिरा अजूनही सुरु आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने 2021 मध्ये मद्यविक्रीसाठी नवीन धोरण तयार केले होते. मात्र हे धोरणच बोगस आणि घोटाळेबाज असल्याचा आरोप, भाजपसह विरोधकांनी केला होता. याबाबतच्या वादावादीनंतर केजरीवाल सरकारने हे धोरण मागे घेत रद्द केलं. 

नव्या धोरणातून राज्याचं उत्पन्न वाढलं

नव्या मद्य विक्री धोरणामुळे केजरीवाल सरकारच्या उत्पन्नात लक्षणीय अशी 27 टक्के वाढ झाली होती. ज्यामुळे सुमारे 8,900 कोटींचे उत्पन्न दिल्ली सरकारला मिळालं होतं. 

याचदरम्यान दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी या प्रकरणात गैरप्रकार झाल्याची भीती व्यक्त केली. या धोरणाविरोधात उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरासह 31 ठिकाणी छापे टाकले होते.

आधी मनिष सिसोदियांना अटक 

यापूर्वी याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना फ्रेबुवारी 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. सिसोदिया यांची आधी सीबीआयने चौकशी केली त्यांनतर त्यांना अटक केली. याचप्रकरणात ईडीनेही उडी घेत, चौकशी आणि धाडसत्र सुरु केलं आहे.दिल्लीच्या मद्य धोरणाच्या संबंधित केसच्या चौकशीसाठी सीबीआयने सिसोदिया यांना बोलावले होते. जवळपास आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
Embed widget