एक्स्प्लोर

Bihar : ना मोदी, ना नितीश, बिहारच्या विजयाचे खरे हिरो निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार; 'आप'ची पोस्ट व्हायरल

AAP Post On Election Commission : निवडणूक आयोगाने बिहारमध्ये SIR पद्धत राबवून आधीच निकाल सेट केला होता असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

Bihar Election Result 2025 : अतिशय चुरशीचा अंदाज व्यक्त केलेली बिहारची निवडणूक एकतर्फीच झाली आणि भाजपप्रणित एनडीएने (NDA) 202 जागा मिळवल्या. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन फक्त 35 जागांपर्यंत मजल मारू शकलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्व कौशल्याचं कौतुक होऊन त्यांना या विजयाचं श्रेय दिलं गेलं. असं असलं तरी आम आदमी पक्षाने मात्र या निवडणूक पद्धतीवर टीका केली आहे. आप पक्षाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून बिहारच्या विजयाचे खरे हिरो हे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असल्याचा टोला लगावला आहे.

बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR पद्धत राबवली आणि ही निवडणूक आधीच सेट केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच बिहारच्या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचं म्हणत आपने भाजपला टोला लगावला आहे.

AAP Post On Bihar Election : 'आप'ची पोस्ट नेमकी काय?

आम आदमी पक्षाने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर बिहार निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण असा प्रश्न विचारला आहे. त्याच्या खाली त्याचं उत्तर ज्ञानेश कुमार असं देण्यात आलं.

AAP Post On Election Commission : नेमकं काय म्हटलंय व्हिडीओमध्ये?

'भाजपचे मंत्री, नेते आणि आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात गेल्यानंतर त्यांना तिथल्या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. काही ठिकाणी तर त्यांच्यावर चिखल आणि शेणही फेकण्यात आलं. असं असलं तरी या बंपर विजयाचा हिरो कोण आहे? ना मोदी, ना नितीश कुमार, ना अमित शाह... बिहारच्या विजयाचे शिल्पकार हे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. तेच आहेत बिहारच्या विजयाचे खरे हिरो. ज्ञानेश कुमार यांच्या जिवावरच मोदींनी त्यांचा गमछा फिरवला. बिहारमध्ये निवडणूक आयोगाने SIR पद्धत रावबली आणि निवडणूक आधीच सेट केली.'

View this post on Instagram
 
A post shared by Aam Aadmi Party | AAP (@aamaadmiparty)

आपचे खासदार संजय सिहं यांनी आधी केलेले एक वक्तव्यही त्या व्हिडीओमध्ये टाकण्यात आलं आहे. SIR पद्धतीमुळे बिहारची निवडणूक निष्पक्ष होणार नाही हे लिहून ठेवा असं संजय सिंह यांनी तीन महिन्यांपूर्वीच म्हटलं होतं.

Bihar Election Result : बिहारमध्ये कुणाला किती जागा?

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने चांगली कामगिरी करत 202 जागा जिंकल्या. भाजप 89 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला, तर जेडीयू 85 जागा जिंकून दुसरा सर्वात मोठा पक्ष बनला. चिराग पासवान यांच्या एलजेपी यांनी 19 जागा जिंकल्या, तर जीतन राम मांझी यांच्या एचएएमने पाच जागा जिंकल्या. उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमने चार जागा जिंकल्या. महाआघाडी फक्त 35 जागांपर्यंत मारू शकली.

Bihar Partywise Seats Result : बिहारमध्ये पक्षनिहाय जिंकलेल्या जागा

एनडीए - 202

भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) : 89

संयुक्त जनता दल (Janata Dal United): 85

लोक जनशक्ती पक्ष (Lok Janshakti Party): 19

हिंदुस्तानी आवाम मोर्चा (Hindustani Awam Morcha) : 5

राष्ट्रीय लोक मोर्चा (Rashtriya Lok Morcha) : 4

महागठबंधन - 35

राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) : 25

काँग्रेस (Indian National Congress ) : 6

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (Communist Party of India Marxist-Leninist) : 2

Indian Inclusive Party : 1 seat

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI M): 1

इतर - 2

एमआयएम (AIMIM) : 5

बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) : 1

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget