एक्स्प्लोर
‘आप’चे माजी मंत्री कपिल मिश्रांना जीवे मारण्याची धमकी
![‘आप’चे माजी मंत्री कपिल मिश्रांना जीवे मारण्याची धमकी Aap Ex Minister Kapil Mishra Threatens To Kill Him On Phone Latest Update ‘आप’चे माजी मंत्री कपिल मिश्रांना जीवे मारण्याची धमकी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/10105816/kapil-mishra-002-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: ‘आप’चे माजी मंत्री कपिल मिश्रांना यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आप नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचं आपण पाहिलं आहे असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला होता. त्याच्यावरूनच मिश्रा यांना जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन येत असल्याचं समजतं आहे.
दरम्यान, मिश्रा यांनी फोन न उचलल्यावर त्यांना व्हॉट्सअॅपवर गोळी मारुन ठार करु असा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. हा फोन आंतरराष्ट्रीय नंबरवरून आल्याचं कळतं आहे. कपिल मिश्रा मागील चार दिवसांपासून मुख्यमंत्री केजरीवालांविरोधात नवनवे खुलासे करत आहेत.
कपिल मिश्रांनी 'आप'च्या इतर नेत्यांविरोधातही मोहीम सुरु केली आहे. मिश्रा यांनी उपोषण सुरु केलं आहे. आप नेत्यांच्या परदेशी दौऱ्यांसाठी कुठून फंडिंग होतं हे जाहीर करावं अशी मागणी कपिल मिश्रांनी केली आहे.
आयकरची ‘आप’ला नोटीस
आम आदमी पार्टीच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कारण आयकर विभागानं आम आदमी पार्टीला नोटीस पाठवली आहे.
20 हजारांहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची माहिती आम आदमी पार्टीकडे नाही. त्यामुळं 15 मे पर्यंत हजर राहण्यासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
आयकर विभागानं आतापर्यंत बाराहून अधिक नोटीस पाठवल्या असून ‘आप’नं कुठलंही उत्तर दिलं नसल्याचंही समजतं. त्याचबरोबर आपनं इतर संस्थांना जी कागदपत्रं सोपवली आहेत,त्यातही फेरफार झाल्याचा आरोप होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण:
अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याचं आपण स्वतः पाहिलं, असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला आहे.
50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पेसै दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवालांच्या एका नातेवाईकासाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावा मिश्रांनी केला आहे.
जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये देताना मी स्वत: पाहिलं, त्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, असंही कपिल मिश्रा म्हणाले. दिल्लीच्या जल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रिपदावरुन कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मिश्रा हे कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात.
संबंधित बातम्या:
'केजरीवालांना चॅलेंज, निवडणूक लढवून निर्दोषत्व सिद्ध करा'
केजरीवालांनी सत्येंद्र जैनांकडून दोन कोटी घेतले : कपिल मिश्रा
कपिल मिश्रांच्या आरोपानंतर अण्णा हजारेंचं केजरीवालांवर टीकास्त्र
‘करावे तसे भरावे’, रॉबर्ट वढेरांचा केजरीवालांवर निशाणाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)