EPFO : जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड चालणार नाही; EPFO कडून आदेश जारी, 'ही' 7 कागदपत्रे आवश्यक
EPFO : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या आदेशानंतर EPFO ने जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) यापुढे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्डला वैध दस्तऐवज मानणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या आदेशानंतर EPFO ने जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी, UIDAI ने आधार कार्डचा वापर एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु तो जन्मतारखेचा पुरावा नाही, असे निर्देश जारी केले होते. UIDAI ने सांगितले होते की, जन्मतारखेचा पुरावा म्हणून द्यावयाच्या कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड काढून टाकण्यात आले आहे.
Need financial help with your #PF, #Pension, or #EDLI schemes?
— EPFO (@socialepfo) January 17, 2024
Call 14470, the multilingual #helpline by #EPFO. Get answers to your queries and guidance from experts.
Call now and share this post with your friends.
#FinancialHelp #EPFOwithYou #EPF #EPS #FinancialSupport pic.twitter.com/x6cJKMijIe
आधार कार्ड ओळख आणि वास्तव्याचा पुरावा
UIDAI ने आपल्या परिपत्रकात म्हटले होते की, आधार हा 12 अंकी आयडी आहे. तो भारत सरकारने जारी केला आहे. तुमच्या ओळखीचा आणि कायम निवासाचा पुरावा म्हणून ते देशभर वैध आहे. त्यावर जन्मतारीख दिलेली असते पण ती जन्म पुरावा म्हणून वापरू नये.
Are you facing EPFO claim rejections because of common mistakes? This video will help you to avoid the rejection: https://t.co/QpBNizUerd#ClaimRejections #Claims #EPFO #EPF #PF #HumHaiNA #EPFOwithYou @PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @LabourMinistry @MIB_India @PIB_India
— EPFO (@socialepfo) January 18, 2024
जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वैध कागदपत्रे
- जन्म आणि मृत्यू निबंधकाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र
- मान्यताप्राप्त सरकारी मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले मार्कशीट
- नाव आणि जन्मतारीख असलेले शाळा सोडल्याचा दाखला
- केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवा रेकॉर्डवर आधारित प्रमाणपत्र
- आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड
- शासनाने जारी केलेले अधिवास प्रमाणपत्र
- सिव्हिल सर्जनने जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र
Know all about EPF Advance on illness!
— EPFO (@socialepfo) January 14, 2024
Employees can apply for advance withdrawals under Provident Fund withdrawal rules.#PFwithdrawl #EPFadvances #ProvidentFund #EPFO #EPF #PF #EPFOwithYou #HumHaiNa #ईपीएफ #पीएफ pic.twitter.com/wECpQ23yYe
इतर महत्वाच्या बातम्या