एक्स्प्लोर

भाजप नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये, गावाच्या वेशीवर फलक

"जर आमच्या गावात भाजप नेते मतं मागण्यासाठी आले, तर ज्याप्रकारे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला, त्याचप्रकारे भाजप नेत्यांचं आमच्या गावात स्वागत केले जाईल"

अमरोहा (उत्तर प्रदेश) : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करणाऱ्या भाजप सरकारचा उत्तर प्रदेशातील अमरोहातील धनौरा तालुक्यात अनोख्या पद्धतीने निषेध केलाय. धनौरा तालुक्यातील रसूलपूर माफीच्या ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच फलक लावून, भाजप नेत्यांना गावात येण्यास बंदी असल्याचे जाहीर केलंय. रसूलपूर माफी गावातील ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करुन एक फलक तयार केलंय. ‘भाजप नेत्यांना गावात येण्यास सक्त मनाई आहे. आल्यास त्यांनी आपल्या जीवाचं रक्षण स्वत:चं स्वत: करावं.’, असा इशाराच रसूलपूर माफीच्या ग्रामस्थांनी भाजपला दिलाय. जर आमच्या गावात भाजप नेते मतं मागण्यासाठी आले, तर ज्याप्रकारे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला, त्याचप्रकारे भाजप नेत्यांचं आमच्या गावात स्वागत केले जाईल, असे रसूलपूर माफीतल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे, केवळ फलक लावून इथले ग्रामस्थ शांत बसले नाहीत, तर गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येते आहे. त्यात कुणी भाजपचा नेता दिसला, तर त्याची खैर नाही, असं ग्रामस्थांनी ठरवलंय. रसूलपूर माफी गावात जवळपास एक हजार मतदार आहेत. आगामी निवडणुकीत म्हणजे 2019 च्या निवडणुकीत या गावातून भाजपला एकही मत दिले जाणार नाही, असे ठरवण्यात आले आहे. या गावाच्या सीमेवरील भाजपविरोधी फलकाचे फोटो सध्या सोशल मीडियावरही वेगात व्हायरल होत असून, फलक पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आजूबाजूच्या गावातील लोकही येत आहेत. बिजनौरमधून खास फलक पाहण्यासाठी आलेले शिवसेना नेते विजय मोहन गुप्ता यांनी गावातील लोकांशी बोलताना सांगितले की, बिजनौरमध्येही अशाचप्रकारचं फलक लावण्यात येईल. एकंदरीत, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर पोलिसांकरवी झालेल्या लाठीहल्ल्याबद्दल देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे दिसून येते आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
Embed widget