एक्स्प्लोर

karnataka Heavy Rain : कर्नाटकमध्ये पावसाचा हाहा:कार; 24 जणांचा मृत्यू, हजारो बेघर

karnataka Heavy Rain : मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत.

karnataka Heavy Rain : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पावसाने थैमान घातलं आहे. चार दिवसांपासून कर्नाटकमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. रस्त्यावर आणि शेतात पाणीच पाणी झालं आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कर्नाटकमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आढावा बैठक घेत शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे.

आठवडाभरापासून कर्नाटकमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे जीवीतहानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसानही झालेय. जनजीवन विस्कळीत झालेय. जवळपास पाच लाख हेक्टर जमीनीवरील पिकं पाण्यात गेली आहेत. कर्नाटकमधील 658 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, 8495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 191 जनावरांचा मृत्यू झालाय. कर्नाटकमधील परिस्थितीचा मुख्यमंत्री बोम्मई यांनी आढावा घेतलाय.  मागील काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरु आहे, आतापर्यंत कर्नाटकमध्ये 24 जणांचा मृत्यू झालाय. एक नोव्हेंबरपासून आतापर्यंत केलेल्या प्राथमिक नुकसान आणि नुकसानीच्या अंदाजानुसार, 658 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर 8,495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे, असं कर्नाटक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर तात्काळ स्वरुपाच्या मदतीची घोषणा केली. 79,000 शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांची मदत जारी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व आधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे आदेश बसवराज यांनी दिले आहेत. तसेच नुकसानग्रस्त रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 

Embed widget