एक्स्प्लोर
कुपवाड्यातील चकमकीत महाराष्ट्राचा वीर शहीद, पांडुरंग गावडे यांना वीरमरण
श्रीनगर : काश्मीरच्या कुपवाड्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जवान पांडुरंग गावडे यांना वीरमरण आलं आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या पांडुरंग गावडे यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडला.
शहीद पांडुरंग गावडे मूळचे सिंधुदुर्गातल्या आंबोली इथले राहणारे होते. काल कुपवाड्यातल्या डरुगमुल्ला गावात दहशतवादी लपून बसले होते.
त्यानंतर भारतीय जवानांनी खास ऑपरेशन राबवून या जवानांना घेरलं आणि पाचही दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय जवानांच्या चमूत जवान पांडुरंग गावडे यांचादेखील समावेश होते. चकमकीवेळी गावडे यांना गोळी लागल्यानं ते जखमी झालेले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, आणि २ मुलं असा त्यांचा परिवार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement