एक्स्प्लोर
महिलेच्या जनधन खात्यात अचानक 99 कोटी रुपये जमा
मेरठ : उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये कामगार महिलेच्या जनधन खात्यात अचानक 99 कोटी रुपये जमा झाले आहेत. महिलेने हा पैसा आपला नसल्याची बँकेकडे तक्रार केली, मात्र बँकेकडून आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलेने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मदत मागितली आहे.
शीतल असं या महिलेचं नाव असून त्या मेरठमधील एका कारखान्यात पाच हजार रुपये प्रतिमहिना वेतनावर काम करतात. 18 डिसेंबरला शीतल आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये आपल्या खात्यातील रक्कम पाहण्यासाठी गेल्या. मात्र एटीएममधून स्लीप येताच त्यांना धक्का बसला. त्यांच्या खात्यावर 99 कोटी 99 लाख 99 हजार रुपये जमा होते.
शीतल आणि त्यांच्या पतीने या प्रकारानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तक्रार दाखल केली. मात्र बँकेकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
बँकेतील अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यानंतर शीतल यांनी पंतप्रधान मोदींना मेल करून मदत मागितली आहे. शीतल यांचं 2015 पासून ब्रम्हपुरी येथील एसबीआयच्या शाखेत जनधन खातं आहे. काळ्याचं पांढरं करण्यासाठी त्यांच्या खात्याचा वापर करण्यात आला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement