7th Pay Commission DA Update :  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. महागाई भत्यात वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होऊ शकते. परंतु, ही पगारवाढ किती होणार याबाबत सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार केंद्रीय क्रर्मचाऱ्यांचा डीए (DA ) 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. 2022 चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सरकार हा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. यासोबतच केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनातही वाढ करण्याची तयारी सरकार करत आहे. 


AICPI डेटानुसार महागाई भत्ता ठरवला जातो
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 31 क्के महागाई भत्ता आहे. त्यामध्ये 3 टक्के वाढ झाली तर तो 34 टक्के होईल. AICPI नोव्हेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार महागाई आता सुमारे 34 टक्के आहे.  


किमान मूळ वेतनात अशी होणार वाढ


कर्मचार्‍याचा मूळ पगार - 18,000 रुपये प्रति महिना
34 टक्के महागाई भत्त्यानुसार - 6120 रुपये प्रति महिना
31 टक्के महागाई भत्त्यानुसार - 5580 रुपये प्रति महिना
महागाई भत्त्यात वाढ - 6120- 5580 = 540 रुपये प्रति महिना
वार्षिक पगारात वाढ – 540X12 = 6,480 रुपये


मूळ वेतनात जास्तीत जास्त वाढ 


कर्मचार्‍याचा मूळ पगार -  56,900 प्रति महिना
34 टक्के महागाई भत्त्यानुसार - 6120 रुपये प्रति महिना
31 टक्के महागाई भत्त्यानुसार - रु. 19,346 प्रति महिना
महागाई भत्त्यात वाढ - 19,346-17,639 = रु. 1,707 प्रति महिना
वार्षिक पगार वाढ – 1,707 X12 = रु. 20,484


दरम्यान, केंद्र सरकार विचार करत असलेला निर्णय घेण्यात आला तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ  होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या